पुणे

अभिनेत्री आशा काळे यांना यंदाचा ‘गदिमा’ पुरस्‍कार

CD

पुणे, ता. २९ ः गदिमा प्रतिष्‍ठानतर्फे देण्‍यात येणारा साहित्‍य, चित्रपट व कला क्षेत्रातील प्रतिष्‍ठेचा ‘गदिमा पुरस्‍कार’ यंदा विख्‍यात अभिनेत्री आशा काळे यांना जाहीर झाला आहे.
दिवंगत अभिनेते लक्ष्‍मीकांत बेर्डे यांच्‍या पत्‍नी प्रिया यांना ‘गृहिणी सखी सचिव’, क्षितिज पटवर्धन यांना ‘चैत्रबन’, तर मनीषा निश्‍चल यांना ‘विद्या प्रज्ञा’ हे पुरस्‍कार देण्यात येतील. १४ डिसेंबर रोजी टिळक रस्‍त्‍यावरील टिळक स्‍मारक मंदिर येथे पुरस्‍कार वितरण होईल. ज्‍येष्‍ठ नाटककार श्रीनिवास भणगे प्रमुख पाहुणे असतील, अशी माहिती संस्‍थेचे कार्यकारी विश्‍वस्‍त आनंद माडगूळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी प्रतिष्‍ठानचे विश्‍वस्‍त प्रा. प्रकाश भोंडे आणि शिवराम कोल्‍हटकर उपस्थित होते.
चित्रपटकथा व गीते, कथासंग्रह, कादंबऱ्या, नृत्‍यनाटिका व गीतरामायण असा नजराणा महाराष्‍ट्राला देणाऱ्या गजानन दिगंबर माडगूळकर अर्थात गदिमा यांचा येत्या १४ डिसेंबरला ४७ वा स्‍मृतिदिन आहे. त्‍यानिमित्त गदिमा प्रतिष्‍ठानतर्फे विविध पुरस्‍कार देण्‍यात येतात.
आशा काळे यांनी चित्रपट व नाटक अशा दोन्‍ही माध्‍यमांतून अभिनयाची प्रदीर्घ कारकीर्द घडविली. अभिनेत्री तसेच कर्तृत्ववान गृहिणी म्‍हणून प्रिया बेर्डे यांची ओळख आहे. क्षितिज पटवर्धन यांनी कथाकार, पटकथाकार, संवाद लेखक तसेच गीतकार म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मनीषा निश्‍चल या नव्‍या उभारीच्‍या गायिका म्‍हणून परिचित आहेत. या वेळी शिक्षणतज्‍ज्ञ व ज्‍येष्‍ठ लेखक न. म. जोशी यांचा प्रतिष्‍ठानच्‍या वतीने विशेष सत्‍कार करण्‍यात येईल.
............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPSC परीक्षेत AI ची एंट्री! 569 उमेदवारांचे अर्ज थेट फेटाळले, कारण वाचून धक्का बसेल... पूजा खेडकर प्रकरणानंतर मोठा निर्णय

Cotton Sowing Delay : कापसाला मिळणार 8,600 रुपये हमीभाव; यंदा 20 टक्के उत्पादन घटण्याची शक्यता, शेतकऱ्यांचे भवितव्य पावसावर अवलंबून

Sindhudurg Mystery: कणकवलीत रहस्यमय घटना! ना भूकंप, ना स्फोट; फोंडाघाट परिसरातील अचानक घरांच्या भिंतींना तडे, घटनेचे गूढ

Ladki Bahin Yojana Scam : लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतलेल्या लाभार्थ्यांकडून सरकार वसूल करणार रक्कम; जिल्हाधिकाऱ्यांना कडक निर्देश

Latest Marathi News Live Update : महायुतीतील २१८ मतांची गूढ फूट; पराभवानंतर भाजपकडून चौकशीचे आदेश

SCROLL FOR NEXT