पुणे, ता. २९ ः आपले शारीरिक आणि मानसिक ‘स्वास्थ्य’ निरोगी ठेवण्यासह स्वसंरक्षण, ध्वनी उपचारपद्धती (साउंड थेरपी), मार्शल आर्ट्स, योगसाधनेचे धडे आणि सेल्फ हिलिंगच्या विविध कला आत्मसात करण्याची संधी ‘सकाळ प्रस्तुत-सुहाना स्वास्थ्यम्’अंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या विविध मार्गदर्शन कार्यशाळांमधून पुणेकरांना मिळणार आहे. शनिवारी (ता. ३०) आणि रविवारी (ता. १) कर्वेनगरच्या डीपी रस्त्यावरील बोगनवेल फार्म्स येथे सकाळी ८ ते सायंकाळी ७ या वेळेत सशुल्क कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे.
प्रत्येकी दोन तासाप्रमाणे दोन दिवसांत एकूण पाच विविध कार्यशाळा होणार आहेत. या बातमीसोबत दिलेला क्यूआर कोड स्कॅन करून या कार्यशाळांमध्ये सहभागी होता येणार आहे. ‘सकाळ प्रस्तुत - सुहाना स्वास्थ्यम्’ या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक ‘सुहाना मसाले’ असून, सहप्रायोजक भारती विद्यापीठ आणि विश्वकर्मा विद्यापीठ हे आहेत. याशिवाय लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि., विजय सेल्स, चंदुकाका सराफ ज्वेल्स, चितळे डेअरी, सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, जॉय अँड क्रू व्हॅकेशन्स, कल्याण ज्वेलर्स, कोलगेट, आत्मबोध वेलनेस आणि द नेचर-मुकाईवाडी हे या उपक्रमाचे सहयोगी प्रायोजक आहेत. याचसोबत फूड पार्टनर अवध रेस्टॉरंट आहेत.
शनिवारची (ता. ३०) मार्गदर्शन सत्रे
१. केरळमधील शरीर स्वास्थ्य कला ‘कलरीपयट्टू’
वेळ - सकाळी ८ ते १०
मार्गदर्शक - बलराज सोनी
२. ‘ताय ची’
वेळ - सकाळी ११ ते दुपारी १
मार्गदर्शक- जगप्रसिद्ध रेफ्री सिफू जॉर्ज थॉमस
३. ताणतणाव मुक्तीसाठी ध्वनी उपचारपद्धती (साउंड थेरपी)
वेळ - दुपारी ३ ते सायंकाळी ५
मार्गदर्शक - प्रियांका पटेल
४. ‘कराटे’ व ‘किक बॉक्सिंग’चे मार्गदर्शन ‘क्राव मागा’
वेळ - सायंकाळी ५ ते ७
मार्गदर्शक - शेल्डन स्टॅनीसलोस
हे लक्षात ठेवा
कधी ः शनिवार (ता. ३०) आणि रविवार (ता. १)
केव्हा ः बोगनवेल फार्म्स, डीपी रस्ता, कर्वेनगर, पुणे
वेळ - सकाळी ८ ते सायंकाळी ७ (प्रत्येकी दोन तासांची कार्यशाळा)
प्रवेशासाठी संपर्क ः
प्रत्येक कार्यशाळेत मर्यादित प्रवेश असून सशुल्क प्रवेशासाठी बातमीसोबत दिलेला क्यूआर कोड स्कॅन करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.