पुणे, ता. ३ : इंटरनॅशनल असोसिएशन फॉर परफॉर्मिंग आर्टस अँड रिसर्च (आयपार) या संस्थेतर्फे आयोजित ‘आयपार इंटरनॅशनल थिएटर फेस्टिव्हल’ यंदा १० ते १५ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे यंदा नववे वर्ष आहे, अशी माहिती महोत्सवाचे संचालक विद्यानिधी वनारसे (प्रसाद) यांनी दिली. हा महोत्सव श्रीराम लागू रंग-अवकाश आणि कलाछाया सांस्कृतिक केंद्र येथे होणार असून महोत्सवाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती आणि अन्य संस्कृतींमध्ये संवाद घडवण्याचा; त्याद्वारे आंतरराष्ट्रीय पातळीवर रंगकर्मींमध्ये संवाद घडवण्याचा प्रयत्न आहे. यंदाच्या महोत्सवात भारतासह इटली, नेदरलँड्स आणि टर्की या देशांमधले नाट्यप्रयोग सादर होणार आहेत. तसेच, विविध कार्यशाळा, नाट्यवाचन सत्रे, चर्चासत्रे, स्थानिक छोटेखानी प्रयोग आदी कार्यक्रम होणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.