पुणे, ता. ३ ः ‘जोयआलुक्कास ज्वेलर्स’ यांच्याद्वारे पुणे आणि पिंपरी येथे साप्ताहिक सुवर्ण नाणे आणि गिफ्ट व्हाउचर विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. जोयआलुक्कास ज्वेलर्सतर्फे पुणे आणि पिंपरी शोरूम्समध्ये ‘प्रत्येक सेलिब्रेशनचा केंद्रबिंदू’ ही ऑफर सुरू करण्यात आली आहे. या ऑफरच्या नवीन विजेत्यांची घोषणा पुणे जिल्ह्याचे प्रमुख सरकारी वकील प्रमोद बोंबटकर आणि स. प. महाविद्यालयाच्या प्राध्यापिका नेहा आगवेकर यांच्या उपस्थित करण्यात आली.
या वेळी मागील दोन आठवड्यांतील लकी ड्रॉमध्ये सोन्याची नाणी आणि गिफ्ट व्हाउचर्स जिंकलेल्या विजेत्यांचे अभिनंदन करण्यात आले, तर सोन्याची नाणी, गिफ्ट व्हाउचर्स आणि भव्य बक्षीस असलेल्या नव्या कोऱ्या थारच्या विजेत्यांची निवड अजून व्हायची असल्याने याबद्दलची उत्सुकता कायम आहे. ही आकर्षक ऑफर ३१ डिसेंबरपर्यंत वैध आहे. त्यामुळे जिंकण्याची संधी मिळवण्यासाठी पुणे आणि पिंपरीमध्ये जोयआलुक्कास शोरूमला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.