पुणे

अमली पदार्थप्रकरणी तीन उच्चशिक्षित तरुणांना अटक

CD

पुणे, ता. ३ : सिंहगड रस्ता परिसरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तीन उच्चशिक्षित तरुणांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून ओजीकुश गांजा, मेफेड्रोन आणि एलएसडी असा १९ लाख ४५ हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत.
अंशुल संतोष मिश्रा (वय २७, रा. बुलडाणा), आर्श उदय व्यास (वय २५, रा. पंतनगर, घाटकोपर पूर्व, मुंबई), पियुष शरद इंगळे (वय २२, रा. चिखली, चिंचवड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. अंशुल बीए पदवीधर असून आर्श एका विमान कंपनीत नोकरीस होता. पियुषने संगणक अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. हे तिघेजण त्यांच्या ग्रुपमधील काही तरुणांना अमली पदार्थ विक्री करीत होते.
अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलिस निरीक्षक उल्हास कदम पथकातील कर्मचाऱ्यांसह सिंहगड रस्ता परिसरात गस्तीवर होते. त्यावेळी नऱ्हे भागातील भूमकर चौकात तिघेजण अमली पदार्थाच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिस अंमलदार संदीप शिर्के यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तिघा तरुणांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता २५१ ग्रॅम ओजीकुश गांजा, १५ ग्रॅम मेफेड्रोन आणि ६२ मिलिग्रॅम एलएसडी अमली पदार्थ आढळून आले.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे, पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, सहाय्यक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली विरोधी पथकाचे सहाय्यक निरीक्षक अनिकेत पोटे, उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, पोलिस अंमलदार सचिन माळवे, विनायक साळवे, प्रवीण उतेकर, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, सुजित वाडेकर, नूतन वारे, रेहाना शेख, विपुल गायकवाड यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT