पुणे, ता. ४ : व्यावसायिकदृष्ट्या आधुनिक हायड्रोपोनिक तंत्राने भाजीपाल्याची शेती करून दर्जेदार गुणवत्तेचे उत्पादन कसे मिळवावे, प्रायोगिक आधारावर ही शेती कशी करावा इ.विषयी मार्गदर्शन करणारी कार्यशाळा शनिवार (ता. ७) व रविवारी (ता. ८) आयोजिली आहे. यात हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाची ओळख, साधने व फर्टिगेशन, पाण्याची गुणवत्ता व अन्नद्रव्ये, देशी-विदेशी भाज्या, पालेभाज्या, फळभाज्या, औषधी वनस्पती इ. प्रकारचा भाजीपाला कसा पिकवावा, घरच्या घरी हायड्रोपोनिक युनिट अथवा गार्डन कसे उभारावे, रोपे कशी तयार करावी, न्यूट्रियंट सोल्यूशन कसे तयार करावे, सामू, प्रकाश, आर्द्रता, तापमान यांचे महत्त्व, अन्नद्रव्यांची कमतरता व उपाय आदींविषयी मार्गदर्शन होणार आहे. शेतकरी, व्यावसायिक, संशोधक, विद्यार्थी, शेतीविषयक सल्लागार इ. प्रशिक्षणात सहभागी होऊ शकतात.
संपर्क : ८४८४८११५४४
यूट्यूब कन्टेन्ट क्रियेटर होण्याची संधी
युट्यूब हे माध्यम सर्जनशीलतेला मुक्त वाव देणारे व आवडीचे काम इतरांपर्यंत पोचविणारे क्षेत्र आहे. अर्ध-वेळ किंवा पूर्ण-वेळ युट्युबर हे या काळात कौशल्याधारित युवकांसाठी उपलब्ध असलेला एक चांगला व्यवसाय आहे. या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक शिवाजी कचरे यांची ‘यूट्यूब सामग्री निर्माता’ ही चार दिवसांची कार्यशाळा ७, ८ व १४, १५ डिसेंबरला आयोजिली आहे. ज्यांना युट्यूब व इतर माध्यमांद्वारे सामग्री निर्माता व्हायचे आहे अथवा जे आधीच असे निर्माते आहेत त्यांना स्वतःची पोहोच वाढवायची आहे, अशांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे. वास्तविक उदाहरणे, प्रात्यक्षिकाद्वारे शिकविण्यावर असलेला भर हे कार्यशाळेचे वैशिष्ट्य आहे. युट्युबद्वारे कमाई कशी करता येते याबद्दलची माहिती, स्वत:चे चॅनेल कसे तयार करावे, कथा व पटकथांचे लेखन, चांगला व्हिडिओ बनविण्यासाठी कॅमेरा, ध्वनी, प्रकाशयोजना आणि संकलनाचे तंत्र वापरून चांगली सामग्री कशी तयार करता येईल याचे उपयुक्त मार्गदर्शन कार्यशाळेत होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४
शासकीय ई-टेंडर प्रक्रिया प्रशिक्षण
विविध शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक विश्वस्त संस्था, देवस्थाने आता ई-टेंडर प्रक्रिया राबवीत आहेत. याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण पुण्यात १४ व १५ डिसेंबरला आणि मुंबईत २१ व २२ डिसेंबरला आयोजिले आहे. यात विविध विभागांतील नोंदणी, न दिसणारे टेंडरसुद्धा कसे शोधायचे, बीओक्यू भरताना येणाऱ्या अडचणी, कागदपत्रे, इएमडी व एसडीमध्ये सूट कशी मिळवायची, स्वतःकडे मशिनरी नसतील तर करावयाचे भाडे करार, निविदापूर्व बैठकीला जाण्यापूर्वी करावयाच्या १५ महत्वपूर्ण गोष्टी कोणत्या याबाबत तसेच इतर महत्त्वाच्या तांत्रिक गोष्टींबद्दल सविस्तर मार्गदर्शन होणार आहे. सरकारी कंत्राटदार, सिव्हिल, इलेक्ट्रिकल इंजिनिअर्स, मटेरिअल पुरवठादार, वाहतूक करणारे, कौशल्य विकास क्षेत्रात काम करणारे, बचतगट, मॅनपॉवर सप्लाय एजन्सी व विद्यार्थ्यांसाठी हे प्रशिक्षण उपयुक्त आहे.
संपर्क : ९३५६९७३४२७
ॲग्री कमोडिटी फ्युचर्स
मार्केटविषयी कार्यशाळा
कमोडिटी मार्केट म्हणजे नक्की काय, हजर बाजार (स्पॉट मार्केट) आणि वायदे बाजार (फ्युचर्स मार्केट) यात फरक काय, मॉडर्न मार्केट्सपैकी इलेक्ट्रॉनिक लिलाव मंच यांचे कार्य कसे चालते, कमोडिटी बाजारात शेतकरी कंपन्या, गट किंवा वैयक्तिक व्यापारी, प्रक्रियादार, गुंतवणूकदार इ.साठी काय संधी आहेत याबाबत मार्गदर्शन करणारी कार्यशाळा १५ डिसेंबरला आयोजिली आहे. यात तज्ज्ञ वायदेबाजाराची ओळख, बाजारभाव ठरविणाऱ्या मूलभूत घटकांची माहिती, सेबीसह विविध संस्थांचे नियंत्रण, नियम-अटी, जोखीम व्यवस्थापनात फ्युचर्स मार्केटची उपयुक्तता तसेच फ्युचर्स कमोडिटी मार्केटमध्ये खाते कसे उघडावे, ट्रेडिंगची सुरुवात कशी करावी, आवश्यक मार्जिन, ब्रोकर्सकडील तांत्रिक व मूलभूत रिसर्चचा ऍक्सेस कसा मिळवावा, ट्रेड झाल्यानंतरच्या प्रक्रिया, थेट पोच किंवा डिलिव्हरी घेण्याची प्रक्रिया इ.विषयी मार्गदर्शन करणार आहेत.
संपर्क : ८९५६७१२६३१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.