पुणे, ता. ७ ः औद्योगिक क्षेत्रात वार्षिक उद्योग सर्वेक्षणाचा (एएसआय) वापर आणि महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (एनएसओ) आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय यांच्यावतीने विशेष शिबिराचे आयोजन केले होते.
आकुर्डी येथील केंद्रीय सदनात शुक्रवारी (ता. ६) हे शिबिर पार पडले. सर्वेक्षणाचा उपयोग आणि महत्त्व याबद्दल औद्योगिक युनिट्स आणि
त्यांच्या अधिकाऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या सत्राचा उद्देश होता. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने विकसित केलेल्या पोर्टलद्वारे एएसआय रिटर्नचे स्वयं-संकलन करण्यासाठीची माहिती यावेळी उद्योग क्षेत्राला देण्यात आली. या सत्राचे उद्घाटन राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या संयुक्त संचालक डॉ. रुही कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. चाकण औद्योगिक संघाचे सचिव दिलीप बटवळ, विभागाचे उपसंचालक नरेश डी. पाटील, महेश चोरघडे, सूरज गुप्ता आणि विभागाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. येथील २५हून अधिक उद्योगांचे उद्योजक, अधिकारी आणि प्रतिनिधी शिबिरात सहभागी झाले होते.
डॉ. रुही कुलकर्णी यांनी सर्वेक्षणाच्या यशात विविध औद्योगिक घटक आणि व्यापारी संघटनांच्या सहकार्याच्या महत्त्वावर भर दिला. या सर्वेक्षणाद्वारे जमा होणाऱ्या डेटाचा उपयोग राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज, औद्योगिक संरचना, नियोजन, पुराव्यावर आधारित निर्णय घेणे आणि जलद औद्योगिक विकासासाठी धोरणे तयार करण्यासाठी केला जातो. वेबद्वारे डेटा गोळा केला जात असल्याने युनिटच्या स्वतःच्या संकलनाची व्यवस्था आहे. वार्षिक उद्योग सर्वेक्षण हे वैधानिक सर्वेक्षण असल्याने, सूचना प्राप्त झाल्यानंतर ठराविक वेळेत रिटर्न आणि संबंधित डेटा जमा करणे आवश्यक आहे, असे त्या म्हणाल्या. देशाची औद्योगिक आकडेवारी वाढवण्यासाठी अचूक आणि वेळेवर डेटा रिपोर्टिंगच्या महत्त्वावर यावेळी भर देण्यात आला. उपस्थितांच्या शंकाचे उपस्थित अधिकाऱ्यांनी यावेळी निरसन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.