आज पुण्यात ८ डिसेंबर २०२४ रविवार
.......................
सकाळी ः
संगीत समारोह ः भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालयातर्फे ः पं. विष्णू दिगंबर पलुस्कर, पं. विनायकबुवा पटवर्धन आणि पं. दत्तात्रय विष्णू पलुस्कर यांच्या स्मृत्यर्थ वि. वि. द. स्मृती संगीत समारोह ः नम्रता गायकवाड (शहनाईवादन), गायत्री जोशी (गायन) व अन्य ः गांधर्व महाविद्यालय, विष्णू विनायक स्वरमंदिर, शनिवार पेठ ः ८.००.
विविध स्पर्धा ः संस्कृत विद्यामंदिर शिक्षण संस्थेतर्फे ः ४३ व्या गीता जयंती महोत्सवानिमित्त विविध स्पर्धा ः विद्या विकास विद्यालय, सहकार नं. १ ः ८.३०.
मेळावा ः महेश बालभवन आयोजित ः मुलांसाठी विविध प्रकारचे खेळ, क्राफ्ट, गाणी, गोष्टी, स्लाइड शो ः हस्ते- राजीव तांबे ः महेश बालभवन, गणंजय सोसायटीजवळ, कोथरूड ः ९.३०.
गांधी दर्शन शिबिर ः महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलातर्फे ः गांधी दर्शन शिबिर ः मार्गदर्शक- कुमार प्रशांत, डॉ. कुमार सप्तर्षी, विनोद शिरसाठ ः गांधी भवन सभागृह, कोथरूड ः ९.३०.
रौप्यमहोत्सव ः तेजज्ञान फाउंडेशन आयोजित रौप्यमहोत्सव ः प्रमुख पाहुणे- डॉ. विजय भटकर ः प्रमुख पाहुणे- सोनू सूद ः मनन आश्रम, सिंहगड रस्ता ः १०.००.
.................
दुपारी ः
लघुपटाचे प्रदर्शन ः स्मिता पाटील इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (SPIFF) तर्फे ः सोहिल वैद्य यांच्या दोन पुरस्कारविजेत्या लघुपटांचे प्रदर्शन ः चित्रपटकर्ते क्रांती कानडे यांच्यासोबत प्रश्नोत्तराचे सत्र ः राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय), लॉ कॉलेज रस्ता ः ३.००.
काव्यसंग्रहाचे प्रकाशन ः मधुश्री प्रकाशन आयोजित ः सुखमणि रॉय रचित ‘शून्य फुलीचा डाव’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन ः हस्ते- सुलभा तेरणीकर ः प्रमुख उपस्थिती- मकरंद गोडबोले, प्रिया साठे, पराग लोणकर ः हॉटेल सेंट्रो, शिरोळे रस्ता, आपटे रस्त्यालगत, शिवाजीनगर ः ४.००.
पुरस्कार प्रदान सोहळा ः चतुरंग प्रतिष्ठानतर्फे ः हास्यचित्रकार शि. द. फडणीस यांना प्रताप गोविंदराव पवार यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान ः प्रमुख पाहुणे- डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, दीपक घैसास, डॉ. सागर देशपांडे, सारंग दर्शने व धनश्री लेले ः नृत्यवंदना- शर्वरी जमेनीस आणि सहकलावती ः स्मरणिका प्रकाशन ः बालगंधर्व रंगमंदिर, शिवाजीनगर ः ४.००.
सायंकाळी ः
शिवप्रताप दिन सोहळा ः जय गणेश व्यासपीठ, प्रतापगड उत्सव समिती, समस्त हिंदू आघाडी आयोजित ः शिवभूषण गोपीनाथपंत बोकील पुरस्कार ः पुरस्कारार्थी- ॲड. अमोल डांगे ः उपस्थिती- शशिकांत ओक, शिरीष महाराज मोरे ः शरदभाऊ मोहोळनगर, नातूबाग मैदान, शुक्रवार पेठ ः ५.००.
पुरस्कार प्रदान सोहळा ः चिदानंद फाउंडेशनतर्फे ः सामाजिक संस्थांना पुरस्कार प्रदान सोहळा ः अध्यक्ष- अच्युत गोडबोले ः प्रमुख पाहुणे- ॲड. रोहित एरंडे ः उपस्थिती- विवेक वेलणकर ः प्रिझम फाउंडेशन (पुणे), उमेद परिवार (पुणे), सेवा सहयोग पुणे संचालित चेतना फाउंडेशन आणि सहयोग गोशाळा (अलिबाग) या संस्थांना पुरस्कार ः ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांच्या कन्या जयश्री काळे यांचा विंदा करंदीकर यांच्या कवितावाचनाचा कार्यक्रम ः गणेश सभागृह, न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रस्ता ः ५.३०.
पुस्तक प्रकाशन ः स्वातंत्र्यवीर सावकर प्रेमी मंडळ आयोजित ः ‘शतपैलू सावरकर’ या ग्रंथाचे प्रकाशन ः हस्ते- विनायक डावरे ः अध्यक्ष-सूर्यकांत पाठक ः वेदशास्त्रोत्तेजक सभा, विजयानगर कॉलनी, सारसबागेजवळ ः ५.३०.
................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.