पुणे

पशू हत्या थांबविण्यासाठी थेट नेपाळ गाठले

CD

पुणे, ता. ७ : पुण्यापासून १९०० किलोमीटर अंतरावर असलेल्‍या नेपाळमधील गधीमाईदेवीच्‍या मंदिरात होणारी प्राणी हत्या थांबविण्‍यासाठी पुण्यातील शाकाहार प्रेरक डॉ. कल्याण गंगवाल यांनी पुढाकार घेत थेट नेपाळ गाठले. नेपाळला जाऊन तेथील लोकांशी, तसेच सरकारशी बोलणी करून या उत्सवात होणारी प्राणी हत्या थांबविण्यासाठी ते प्रयत्‍न करत आहेत.
वयाच्या ८० व्‍या वर्षी कार्यरत असलेले डॉ. गंगवाल हे गेल्या अनेक वर्षांपासून देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पशुबळी थांबविण्यासाठी काम करत आहेत. त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून समाजात पशुबळीविरोधी चळवळीसाठी व्यापक काम केले आहे. गधीमाईदेवी मंदिराच्या आवारात दर पाच वर्षांनी जगातील सर्वात मोठे प्राण्यांचे बलिदान दिले जाते. त्या ठिकाणी प्राण्यांची निर्घृणपणे हत्या केली जाते. नेपाळ, तसेच भारतातील विविध राज्यांतील, तसेच महाराष्ट्रातूनदेखील अनेक लोक त्या ठिकाणी जात असतात.
गधीमाईदेवीला बळी दिला की मनातील मनोकामना पूर्ण होतात. तसेच, नवसाला पावणारी ही देवी, अशी लोकांची भावना असल्याने मोठ्या प्रमाणात प्राण्यांचे बळी दिले जातात. महिनाभर चालणाऱ्या उत्सवात हजारो प्राण्यांच्या कत्तली केल्या जातात. २०१९ मध्ये सुमारे लाखो म्हशी, बकऱ्या, कबुतरे व इतर प्राण्यांची कत्तल केली होती.
दरम्‍यान, अंदाजे ७० टक्के प्राणी हे भारतातून तिकडे आयात केले जातात. वाहतुकीदरम्यान त्या प्राण्यांना पुरेसे अन्न, पाणी, निवारा मिळत नाही. त्यांची अवैधरीत्या तस्करी केली जाते. त्या प्राण्यांना जिवंतपणीच मरणयातना दिल्या जातात. गधीमाई येथील निष्पाप प्राण्यांची बळी देण्याची प्रथा ताबडतोब बंद करावी, अशी मागणी डॉ. गंगवाल यांनी पत्रकाद्वारे केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बंगालमध्ये भाजपचा 'खेला'; ममतांचा पराभव करण्यासाठी काढला हुकुमाचा एक्का, कोण आहेत सुवेंदू अधिकारी?

Rashid Khan: पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यावर रशीद खानचा तीव्र संताप; म्हणाला, 'रमजानच्या पवित्र महिन्यात ही क्रूरता...'

IPL Kisse: वानखेडेवर शाहरुखचा संताप! विलासराव देशमुखांचा एक निर्णय अन् 5 वर्षांची बंदी, 2012 मधील IPL सामन्यात काय घडलं होतं?

NDA Rajya Sabha Majority : राज्यसभेत एनडीएची दमदार एंट्री; बहुमताचा आकडा पार, विधेयक मंजुरीसाठी येणार नाही अडचण

Nagpur News: विद्युत पोलवरून पडून कंत्राटी कामगाराचा मृत्यू; देवलापारच्या वाघोली परिसरातील घटना, गावात शोककळा

SCROLL FOR NEXT