पुणे, ता. ७ : ‘शाहिरी जलसा’, ‘संविधान उद्देशिकेचे वाचन’, ‘आंबेडकरी काव्याची मैफल’, ‘व्याख्यानातून उलगडलेले आंबेडकर’, ‘विविध चर्चासत्र व परिसंवाद’, ‘माणुसकीप्रती करू रक्तदान उपक्रमांतून रक्तपिशव्यांचे संकलन’ अशा विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांतून सलग २४ तास आंबेडकरी विचारांचा जागर करीत रुग्ण हक्क परिषदेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८व्या महापरिनिर्वाणदिनी अभिवादन केले. रक्तदान शिबिरात ७१५ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रुग्ण हक्क परिषदेतर्फे पुणे स्टेशन येथील डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात ‘आंबेडकरी विचारांचा जागर’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी रुग्ण हक्क परिषदेचे प्रमुख उमेश चव्हाण, पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, माजी सहाय्यक पोलिस आयुक्त मिलिंद गायकवाड, अपर्णा साठे, दिलीप साळुंके, आशिष गांधी आदी उपस्थित होते.
या उपक्रमाला आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते ॲड. जयदेव गायकवाड, डॉ. अमोल देवळेकर, शैलेंद्र चव्हाण, असित गांगुर्डे, विशाल शेवाळे यांनी भेट दिली. महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला गायक राहुल शिंदे आणि कलाविकास संघ सहकार्यांनी आदरांजलीपर वैचारिक गीते सादर केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.