पुणे

‘एमपीएससी’च्या उत्तराने विद्यार्थ्यांची ‘परीक्षा’

CD

प्रज्वल रामटेके ः सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ७ ः महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) एक डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा २०२४ घेण्यात आली होती. या परीक्षेची उत्तरतालिका आयोगातर्फे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या उत्तरतालिकेतील तीन प्रश्नांची उत्तरे आयोगानेच चुकीची नमूद केल्याने विद्यार्थ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
परीक्षेच्या पाच दिवसांनंतरच आयोगाने परिक्षेची उत्तरतालिका प्रसिद्ध केली. आयोगाने प्रसिद्ध केलेल्या उत्तरतालिकेतील उत्तरसूचीवर तक्रारी, आक्षेप नोंदवण्यासाठी आयोगातर्फे दहा डिसेंबरपर्यंत संधी दिली आहे. त्यानुसार परीक्षार्थीनी उपलब्ध असलेल्या संदर्भांसह आक्षेप नोंदवण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, अंतिम उत्तर सूचीनंतरच अधिक स्पष्टता येईल, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.
या परीक्षेमध्ये विज्ञान, अर्थशास्त्र आणि भूगोल या विषयांच्या तीन प्रश्नांच्या उत्तराबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पण त्यासाठी उत्तरावर आक्षेप नोंदवण्यासाठी ऑनलाइन पुराव्यांसह ते मुदतीमध्ये नोंदवायचे आहेत, अन्यथा त्यांच्या आक्षेपांचा विचार केला जाणार नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
याविषयी बोलताना एका परीक्षार्थीने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, अनेक विद्यार्थी फक्त २५ अंश गुण कमी मिळाल्यामुळे आपल्या ध्येयापासून चुकतात. त्यामुळे आयोगाने उत्तरे बदलली नाहीत तर अनेक विद्यार्थ्यांना साडेसात गुणांचा तोटा सहन करावा लागू शकतो. त्यामुळे आयोगाने याचे गांभीर्य लक्षात घेऊन बदल करणे अपेक्षित आहे.

हे आहेत प्रश्न
१) प्रश्न ः खालीलपैकी कोणती विधाने महाराष्ट्राच्या बाबतीत २०११ च्या जनगणनेनुसार बरोबर आहेत?
अ) लोकसंख्येत महाराष्ट्रात देशात दुसरा ब) घनता ३६५ चौ. किमी आहे. क) साक्षरता ८२.९१ टक्के आहे. ड) लिंग गुणोत्तर ९२५ आहे.
पर्याय : १) अ, ब, क २) अ आणि ब, ३) अ, ब, ड, ४) वरीलपैकी सर्व
स्पष्टीकरण ः आयोगाच्या उत्तरतालिकेनुसार वरीलपैकी सर्व हा पर्याय योग्य असल्याचे नमूद केले आहे. परंतु लिंग गुणोत्तर ९२५ नाही, तर राज्याचे लिंग गुणोत्तर हे शासनाच्या संकेतस्थळावर ९२९ आहे. त्यानुसार देण्यात आलेल्या उत्तरामध्ये पर्याय १ हे उत्तर अपेक्षित असताना आयोगाच्या सूचीत पर्याय ४ दिला आहे. त्यामुळे कोणते उत्तर बरोबर, असा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला आहे.

२) प्रश्न : चंद्रपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दगडी कोळसा सापडतो?
अ) बांदर ब) घोगुस क) तेलवासा ड) वणी
पर्याय ः १) अ, ब आणि क, २) फक्त अ, ३) फक्त ब, ४) ब, क, आणि ड
स्पष्टीकरण ः याचे उत्तर आयोगाने पर्याय दोन बरोबर दिले आहे. मात्र योग्य उत्तर हे पर्याय एक अ, ब आणि क अर्थात बांदर, घोगुस, तेलवासा हे अपेक्षित आहे.

३) प्रश्न - हिगीन्स यांच्या मते लोकसंख्येत होणारी वाढ ही....
स्पष्टीकरण ः आयोगाने केवळ अ हाच पर्याय बरोबर असल्याचे उत्तरतालिकेत नमूद केले आहे. परंतु अ आणि ब हे दोन्ही पर्याय हवे होते.

तीन प्रश्नांपैकी दोन प्रश्नांच्या उत्तरांचे ठोस पुरावे उपलब्ध आहेत. मात्र एका प्रश्नाबाबत संभ्रम आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आयोगाने बदलले नाही तर विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. ज्या प्रश्नाबाबत आयोग आणि विद्यार्थी या दोघांमध्ये संभ्रम आहेत असे प्रश्न रद्द करायला हवेत.
- रवी मोरे, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : लासलगावात टर्फ मैदानावर राडा! भांडण सोडवायला गेलेल्या तरुणावर सिमेंटच्या गट्टूने हल्ला

धनंजय मुंडेंना आणखी एका प्रकरणात क्लिन चीट, राज्याच्या लोकायुक्तांनी फेटाळले आरोप

Latest Marathi News Live Update : ISISशी संबंधित प्रकरणी ATSचे मुंबईत छापे

ट्रक ड्रायव्हरच्या प्रेमात पडली अभिनेत्री, लिव्ह इन पार्टनरला संपवलं; १२ दिवस घरात सडला मृतदेह, तिघांना अटक

Vijay Deverakonda: लग्नानंतर विजय देवरकोंडाचा मास्टरस्ट्रोक! तेलंगणातील ९वी अन् १०वीच्या मुलांसाठी केली स्कॉलरशिप जाहीर

SCROLL FOR NEXT