पुणे

वाहनं बळकावताहेत पादचाऱ्यां‍ची जागा

CD

पादचारी वाहनांच्या रस्त्यावरून चालत असतील, तर पदपथ चुकला हे स्पष्ट आहे! पादचाऱ्यांना आणि सायकलस्वारांना सुरक्षितपणे जायला जागा मिळालीच पाहिजे. वर उल्लेख केलेले बस थांबे, झाडं, पथदिवे हेही महत्त्वाचे घटक आहेत. त्यांनाही प्राधान्याने जागा द्यायला हवी. चारचाकी आणि दुचाकींचा विचार त्यानंतरच व्हायला हवा. ‘पादचारी राजा’ वगैरे फलक लावतो ना आपण? मग पादचाऱ्यांना सन्मानाने वागवायलाही हवं, त्यांची हक्काची जागा देऊन! आणि या सगळ्याची सुरुवात लवकर व्हावी, म्हणूनच पाळायला हवा, ११ डिसेंबरचा पादचारी दिन.
- हर्षद अभ्यंकर, सेव्ह पुणे ट्राफिक मूव्हमेंट


परवाच मी जोशीकाकांशी गप्पा मारत होतो. ते त्यांच्या लहानपणच्या आठवणी सांगत होते, शनिवार पेठेतल्या. आणि ७० च्या दशकातल्या बरं का, स्वातंत्र्यपूर्व काळातल्या नव्हे. त्यांची मित्रमंडळी सुट्टीत गल्लीत क्रिकेट खेळायची. फलंदाजाने चेंडू पहिल्या मजल्यावर किंवा कोपऱ्यावरच्या ३ बाय ३ फुटांच्या गणपतीच्या ‘देवळात’ मारला, तर तो बाद! उन्हाळ्यात संध्याकाळी साडेसातपर्यंत भरपूर उजेड असायचा आणि सायकली वगळता वाहतूक अगदीच तुरळक असायची. एखादं वाहन आलंच, तर मुलं त्याला जायला जागा करून देईपर्यंत ते वाहनच थांबायचं!
गल्ल्यांमध्ये फक्त मुलं खेळायची असं नाही, तर लोक निवांत गप्पा मारतही उभे असायचे. फार काय, अलीकडच्या घरातल्या ताई समोरच्या घरातल्या अक्कांची चौकशीही खिडकीतूनच करू शकायच्या! गल्लीतले झाडून सगळे जण एकमेकांना ओळखायचे, कारण ते सगळेजण गल्लीतच भेटायचेही.
‘‘हे सगळं कसं आणि कधी ढासळलं? आपण ते का ढासळू दिलं?’’ जोशीकाका त्रागा करत होते.
‘‘अहो, शहर वाढणार, रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार.’’ ‘‘चांगलंच आहे. पण त्याने आधीच्या चांगल्यावर आक्रमण केलंच पाहिजे का?’’ ‘‘पण वाहनांची संख्या वाढणारच ना?’’ आमचा वादच सुरू झाला!
‘‘हो, पण म्हणजे रस्त्याने चालायचा आणि रस्ता सुरक्षितपणे ओलांडायचा माझा हक्क तुडवला गेला तरी चालेल का? कोणत्या अ‍ॅक्टानुसार?’’ त्यांचा मुद्दा एकदम बिनतोड होता खरा!
‘‘अहो, तेव्हा शनिवारातून हडपसरला असे कितीसे लोक जायचे? आता पार बावधनपासून मगरपट्ट्याला हजारो लोक रोज कामाला जातात! वाहनांना जागा दिल्याशिवाय हे कसं शक्य आहे?’’
‘‘मी कुठे म्हणतोय की लोकांना कामाला जाऊ देऊ नका म्हणून? ते जाऊ देत की मोठ्या रस्त्यांवरून. पण आमच्या गल्ल्या सोडा की! हो, मला माहीत आहे की सगळे जण मोठ्या रस्त्यांवरच नाही राहात, अनेकांची घरं आजही गल्ल्यांमध्येच आहेत. पण ते दहा-बारा मिनिटं चालत मोठ्या रस्त्यावर जाऊन तिथून बस पकडू शकतात की. आपण तशी व्यवस्थाच उभारत नाही. आपण वाहनांना पादचाऱ्यांची जागा सरळसरळ बळकावू देतोय!’’
घरी परतताना मी विचार करत होतो आणि मला त्यांचा मुद्दा पटायला लागला. आपण वाहनांना मुक्तहस्ते जागा देतोय. तीही फुकट. मग ती आणखी जागा मागणारच. हा उंट आपल्या तंबूत घुसतोय, तो आपल्यालाच एक दिवस तंबूबाहेर काढणार आहे!
मग आपण काय करायला हवं? काय वाट्टेल ते झालं, तरी लोकांना रस्त्याने व्यवस्थित चालता यायला हवं आणि सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यायला हवा. रस्त्यावरचे दिवे, बस थांबा, झाडं हे बारकावे सांभाळूनही लोकांना चालायला जागा मिळायला हवी. आणि हो, लोकांना फक्त चालायलाच जागा लागते असं नाही. कोणाची वाट पाहात उभं राहायला, पत्ता शोधायला, रस्ता ओलांडायची वाट पाहायला किंवा अचानक भेटलेल्या मित्राशी दोन शब्द बोलायला- अशा अनेक गोष्टींसाठीही लोकांना जागा लागते. ही जागाही आपण वाहनांना बळकावू देता कामा नये.
सकाळी लवकर किंवा भारत-पाक सामना चालू असताना रस्ते कसे प्रशस्त दिसतात, पाहिलेत कधी? मग वाहनांना ३+३ लेन्स, पण पादचाऱ्यां‍ना अगदीच जेमतेम पदपथ- इतका अरुंद, की त्यांना रस्त्यावरूनच चालावं लागतंय, असं का? पथारीवाले तर पदपथ नसलेल्या रस्त्यांवरही बसतात. म्हणून आपण रस्ते बांधायचे थांबवतो का? पादचाऱ्यांना अशी वागणूक का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT