पुणे, ता. ७ ः ‘सकाळ माध्यम समूह’, फर्माईशे आणि तेज ॲडव्हर्टायझिंग-पुणे निर्मित दिवंगत गायक मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त ‘सुहाना समा विथ अन्नू कपूर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम २७ डिसेंबर रोजी कर्वेनगर येथील महालक्ष्मी लॉन्स् येथे सात ते दहा या वेळेत होणार आहे.
मोहम्मद रफी यांचे जन्मशताब्दी वर्ष २४ डिसेंबर रोजी होत आहे. ‘सुहाना समा विथ अन्नू कपूर’ या कार्यक्रमाद्वारे त्यांना एक सुरेल सांगितिक मानवंदना अर्पण केली जाणार आहे. रफी यांनी त्यांच्या सांगितिक प्रवासामध्ये असंख्य भावपूर्ण अशी हिंदी, मराठी तसेच इतरही भाषांमध्ये गाणी गायली आहेत. हिंदी सिनेमा जगतामध्ये रफी हे काही प्रमुख स्टार अभिनेत्यांचा आवाज म्हणून ओळखले जात असत.
यावेळी रफी यांच्या गायनाचे विविध किस्से, आठवणी, त्यांचे वेगवेगळ्या संगीतकारांच्या बरोबरचे ज्ञात-अज्ञात अनुभव, त्यांच्या आयुष्यातील माहीत नसलेले किस्से निवेदक, अभिनेते, दिग्दर्शक, रेडिओ जॉकी असलेले अन्नू कपूर सादर करणार आहेत. कपूर यांचा हा पुण्यातील पहिलाच व्यावसायिक कार्यक्रम आहे. त्यांच्या माध्यमातून रफी यांच्या आठवणी, किस्से ऐकण्याची संधी पुणेकर रसिक प्रेक्षकांना या कार्यक्रमाद्वारे मिळणार आहे.
रफी यांच्या अनेक सुप्रसिद्ध गाण्यांपैकी काही निवडक गाणी गायक धवल चांदवडकर, आशिष श्रीवास्तव आणि रसिका गानू हे वादक कलाकारांसह सादर करणार आहेत. या कार्यक्रमाची तिकिटे बुक माय शो आणि तिकिटखिडकी डॉट कॉम या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच ८८०६७ ८११८० या क्रमांकावर सुद्धा बुकिंग करता येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.