पुणे, ता. ७ ः ‘‘अमेरिकेसह अनेक देशांमध्ये ईव्हीएमवर बंदी आहे. ईव्हीएमवर मी चार वेळा निवडून आले, पण माझ्यासह समाजातही ईव्हीएमबाबत अस्वस्थता आहे. म्हणूनच ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याची मागणी होत आहे. त्याची दखल घेऊन निवडणूक आयोगानेही बदल करावा,’’ अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी केली.
ईव्हीएमच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याबाबत सर्वांशी चर्चा करूनच पुढील आठवड्यात ठरविले जाईल, असेही त्यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले.
त्या म्हणाल्या, ‘‘इंडिया आघाडीतील घटक पक्षांची मागील आठवड्यातच चर्चा झाली. काँग्रेस पक्ष अनेक वर्षे ईव्हीएमबाबत काम करीत आहे. आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. विधानसभा निवडणुकीनंतर आमच्या कार्यकर्त्यांच्या, जनतेच्या मनातही अस्वस्थता निर्माण झाली आहे. उत्तम जानकर यांचे आंदोलन व मारकडवाडीतील लोकांमधील अस्वस्थता या बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत. लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही लोकांच्या मनातील ऐकून घेतले पाहिजे.’’
सुळे म्हणाल्या, ‘‘काँग्रेसच्या संग्राम थोपटे यांना अनेक केंद्रांवर अत्यल्प मतदान झाले. अशी अनेक उदाहरणे आम्ही देऊ शकतो. असे होऊच शकत नसल्याचे सर्वांचे म्हणणे आहे. आम्ही कोणाच्याही वैयक्तीक विरोधात लढत नसून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व्हावी आणि समाजात एखाद्या प्रक्रियेबद्दल शंका असेल, तर ती दुरुस्त व्हायला पाहिजे इतकीच आमची मागणी आहे.’’
--------------
सुळे म्हणाल्या,
- देशाचे दरडोई आर्थिक उत्पन्न, विकास दरातील फरकामुळे गंभीर प्रश्न उद्भवण्याची शक्यता
- सशक्त विरोधी पक्षासाठी ममता बॅनर्जी पुढे येत असतील तर त्यांचे स्वागतच
- शपथविधी सुरु असतानाच मुख्यमंत्री, उपमुख्यत्र्यांना समाजमाध्यमाद्वारे शुभेच्छा दिल्या
- काँग्रेसच्या पूर्वीच्या कृतीप्रमाणे विरोधी पक्षनेतेपद देण्याचा मोठेपणा भाजपने दाखवावा
- संविधानाच्या चौकटीत राहून आंदोलन करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे कसे दाखल होतात ?
- गरिबांना मुदत संपलेली औषधे सरकार देत असेल तर हे गंभीर
--------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.