पुणे, ता. ११ ः जिल्ह्यातील उद्योग क्षेत्राची स्थिती कशी आहे, हे समजून घेण्यासाठी ‘मराठी चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज आणि ॲग्रिकल्चर’तर्फे (एमसीसीआयए) नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यात गेल्या आर्थिक वर्षीच्या (२०२३-२०२४) तुलनेत यंदाच्या आर्थिक वर्षांत (२०२४-२०२५) उद्योगांची काय स्थिती आहे, हे मांडण्यात आले आहे. यात सकारात्मक बाब म्हणजे जिल्ह्यातील ८१ टक्के उद्योजकांनी उद्योगात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वाढ होऊ शकते, अशी आशा व्यक्त केली आहे, तर नऊ टक्के उद्योजकांनी उलाढालीत घट होऊ शकते, असे नमूद केले आहे.
मार्च २०२५ पर्यंत दरमहा हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यंदाच्या आर्थिक वर्षांत आत्तापर्यंत कंपन्यांची किती वाढ झाली व मार्च अखेरपर्यंत किती वाढ होऊ शकते, याचा अंदाज घेत त्याची मागील वर्षांशी तुलना करण्यात आली आहे. हा सर्व्हे ‘एमसीसीआयए’ने यापूर्वी केलेल्या दोन वर्षांच्या मासिक सर्वेक्षणावर आधारित आहे. यापूर्वी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात कोरोनाचा उद्योगक्षेत्रावर काय परिमाण झाला, याचे मूल्यांकन करण्यात आले होते. जिल्ह्यातील जवळपास सर्वेच उद्योगांची उलाढाल कोरोनापूर्वी असलेल्या उलाढालीपर्यंत पोचली आहे, असे त्या सर्वेक्षणाच्या शेवटच्या टप्प्यात दिसून आले होते.
नोव्हेंबरमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात १०८ कंपन्यांनी सहभाग घेतला होता. त्यातील महत्त्वाचे निष्कर्ष असे की, ८१ टक्के कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनात वाढ होऊ शकते, असे नमूद केले होते, तर नऊ टक्के कंपन्यांचे म्हणणे आहे की, उलाढालात बदल होऊ शकत नाही. तर ९ टक्के कंपन्यांनी उद्योगात घट होणार असल्याचे नमूद केले आहे. यात महत्त्वाची बाब म्हणजे, ३७ टक्क्यांपेक्षा जास्त कंपन्यांपैकी २० किंवा त्याहून अधिक महसूल वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या सर्वांत संरक्षण आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादन उद्योगांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
महत्त्वाचे मुद्दे
- सर्वेक्षणात १०८ कंपन्यांचा सहभाग
- मार्च २०२५ पर्यंत दरमहा सर्वेक्षण होणार
- जिल्ह्यातील कंपन्यांचा सहभाग
- संरक्षण आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादन उद्योगांचे योगदान महत्त्वाचे
कंपन्यांनी वर्तवलेला अंदाज
कंपन्यांची संख्या - काय असेल उद्योगाची स्थिती
१० - तोटा होर्इल
१० - वाढ होर्इल
२० - १ ते १० टक्के वाढ होर्इल
२८ - १० ते २० टक्के वाढ होर्इल
४० - ४० टक्क्यांहून अधिक वाढ होर्इल
सहभागी कंपन्यांचे स्वरूप (टक्केवारीत)
बड्या - ५ (२५० कोटीपेक्षा जास्त उलाढाल)
मध्यम - ९
लहान - ३०
सूक्ष्म - ५६
या सर्व्हेमध्ये असे निदर्शनास आले आहे की, उद्योगाच्या वाढीबाबत कंपन्यांची सकारात्मक भावना आहे. संरक्षण क्षेत्रातील उद्योगांना स्वदेशीकरणाचा विशेष फायदा होत आहे. यापुढील काळात दर महिन्याला हा सर्व्हे करण्यात येणार आहे.
- प्रशांत गिरबने, महासंचालक, ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीज’ (एमसीसीआयए)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.