पुणे, ता. ११ : हॉटेलमधून पार्टी करून घरी जाणाऱ्या भरधाव मोटारचालकाने बॅरिकेडला धडक देऊन महिला पोलिस कर्मचाऱ्यास फरफटत नेल्याची घटना घडली होती. पोलिसांनी या मोटारचालकास अटक केली आहे.
अर्णव पवनकुमार सिंघल (वय २४, रा. जनवाडी, मूळ रा. फिरोजाबाद, उत्तर प्रदेश) असे या मोटारचालकाचे नाव आहे.
एसएसपीएमएस महाविद्यालयासमोर सोमवारी (ता. ९) रात्री नाकाबंदी करण्यात आली होती. पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास कोरेगाव पार्ककडून भरधाव येणाऱ्या मोटारीला पोलिसांनी थांबण्यास सांगितले, परंतु मोटारचालकाने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मोटारचालक सिंघल याने बॅरिकेडला धडक देऊन पोलिस अंमलदार दीपमाला राजू नायर यांना फरफटत नेले होते. या घटनेची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली. अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे, पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे आणि पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी तपास करण्याचे आदेश दिले.
गुन्हे शाखेच्या पथकाने अपघातामधील मोटारचालकाची माहिती काढली. तो जनवाडीत राहत असून, रेंज हिल्स भागात असल्याची माहिती मिळाली. मोटारचालक सिंघल याच्याविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.