कमोडिटी मार्केट म्हणजे नक्की काय, हजर बाजार (स्पॉट मार्केट) आणि वायदे बाजार (फ्युचर्स मार्केट) यात फरक काय, मॉडर्न मार्केटपैकी इलेक्ट्रॉनिक लिलाव मंच यांचे कार्य कसे चालते, कमोडिटी बाजारात शेतकरी कंपन्या, गट किंवा वैयक्तिक व्यापारी, प्रक्रियादार, गुंतवणूकदार आदींसाठी काय संधी आहेत, याबाबत मार्गदर्शन करणारी कार्यशाळा येत्या रविवारी (ता. १५) आयोजिली आहे. यात तज्ज्ञ वायदेबाजाराची ओळख, बाजारभाव ठरवणाऱ्या मूलभूत घटकांची माहिती, सेबीसह विविध संस्थांचे नियंत्रण, नियम-अटी, जोखीम व्यवस्थापनात फ्युचर्स मार्केटची उपयुक्तता तसेच फ्युचर्स कमोडिटी मार्केटमध्ये खाते कसे उघडावे, ट्रेडिंगची सुरवात कशी करावी, त्यासाठी आवश्यक मार्जिन, ब्रोकर्सकडील तांत्रिक व मूलभूत रिसर्चचा ऍक्सेस कसा मिळवावा, ट्रेड झाल्यानंतरच्या प्रक्रिया, थेट पोच किंवा डिलिव्हरी घेण्याची प्रक्रिया आदींविषयी मार्गदर्शन करणार आहेत.
संपर्क : ८९५६७१२६३१
शंख साधना कार्यशाळा
भारतीय संस्कृतीमध्ये शंख व त्याच्या ध्वनीला पावित्र्य आहे. ही एक खूप प्राचीन साधना आहे. शंख साधनेद्वारे श्वासोच्छ्वास लांब होतात व दम्यासारखे श्वसनाचे व थायरॉईड, रक्तदाब, मधुमेह संबंधित आजार बरे होतात असा अनेकांचा अनुभव आहे. ज्या व्यक्ती धूम्रपान करतात त्यांनी नियमित शंख साधना केल्यास धूम्रपानाचे व्यसन दूर होते. नियमित योगसाधना करणाऱ्यांनी शंखसाधना केल्यास अंतःकरण अधिक शुद्ध होण्यास मदत होते. मुली आणि महिलाही ही साधना करू शकतात. या पार्श्वभूमीवर येत्या रविवारी (ता. १५) शंख साधनेविषयी प्रात्यक्षिकासह माहिती देणारी कार्यशाळा आयोजिली आहे. यामध्ये शंख व सनातन धर्म, शंखाचे प्रकार, शंखाची नैसर्गिक निर्मिती, शंख नाद, शरीर व योग यांची माहिती व शंख नादाचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४
शासकीय एस्टिमेट प्रशिक्षण
शासकीय कामांचे मूल्यनिर्धारण, एस्टिमेशन हे बांधकाम, स्थापत्य विभागातील, कॉन्ट्रॅक्टर, विद्यार्थ्यांना उपयुक्त असे प्रशिक्षण २१ व २२ डिसेंबर रोजी आयोजित केले आहे. प्रशिक्षणात पीडब्ल्यूडी, एसएसआर, रेट, नियमावली, टेस्टिंग, मेजरमेन्ट शीट, रेट तपासणी, चार्ट, एस्टिमेशन सॉफ्टवेअर व एस्टिमेशन बनविणे, तयार करणे, समाज मंदिर, सभा मंडप, शाळा, अंगणवाडी, सुरक्षा भिंत आशा प्रकारचे कामे व एस्टिमेशन आदींबाबत मार्गदर्शन करण्यात येईल.
संपर्क : ९३५६९७३४२७
ग्रामस्तरावरील व्यवसाय विकास प्रशिक्षण
शेतमाल व अन्न प्रक्रिया, कुटीरोद्योग, गृहोद्योग, स्थानिक व नैसर्गिक संसाधनांवरील प्रक्रियाआधारित उद्योग इत्यादी विविध प्रकारचे उद्योग व व्यवसाय करण्यासाठी इच्छुक गावातील होतकरू, उद्यमशील युवावर्ग, महिला, शेतकरी यांच्यासाठीचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. गावामध्येच ग्रामपंचायत किंवा स्थानिक संस्थांच्या माध्यमातून या व्यावसायिक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यासाठी सकाळ व ॲग्रोवन संलग्न प्रशिक्षण संस्था असलेल्या सिमासेस लर्निंगद्वारे (SIILC) ही प्रशिक्षण सेवा उपलब्ध केली जात आहे. गावामध्ये अशा प्रकारचे व्यवसाय विकास प्रशिक्षण आयोजित करण्याची तयारी असलेल्या ग्रामपंचायती तसेच स्थानिक संस्थांनी सिमासेस लर्निंगकडे संपर्क साधावा.
संपर्क : ८९५६७१२६३१, ९३०७६४९०४७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.