पुणे

पुणेकरांनी लुटला ‘वॉक वे’चा आनंद

CD

पुणे, ता. ११ ः सापशिडीसारखे खेळ खेळण्यात दंग झालेली मुले, तर शहराच्या विकासासाठी काय केले पाहिजे, याबाबतची माहिती वाचण्यात व्यस्त झालेले ज्येष्ठ नागरिक...महिला, तरुणींची त्यांच्या आवडीची सौंदर्य प्रसाधने, कपडे खरेदी करण्यासाठी झालेली गर्दी, तर आजी-आजोबांसोबत पाणीपुरी, भेळपुरीचा आस्वाद घेणारी व धम्माल मस्ती करणारी मुले...हे आनंदोत्सवाचे चित्र एखाद्या पर्यटन ठिकाणांवरील नव्हे, तर आपल्या नेहमीच गजबजलेल्या लक्ष्मी रस्त्यावरील आहे. एरवी वाहनांच्या गर्दीत हरवलेला लक्ष्मी रस्ता बुधवारी ‘पादचारी दिना’च्या ‘वॉक वे’ उपक्रमामुळे वाहन विरहित तर होताच, माणसांच्या गर्दीने अक्षरशः फुलून गेला होता.
पुणे महापालिकेच्या वतीने लक्ष्मी रस्त्यावर पादचारी दिनानिमित्त बुधवारी ‘वॉक वे’ या उपक्रमाचे आयोजन केले होते. खासगी वाहनांचा वापर कमी करून पीएमपीएल बस, मेट्रो यांसारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या वापराला प्राधान्य द्यावे, पायी चालण्यास प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम आयोजित केला होता. या उपक्रमासाठी लक्ष्मी रस्त्याला सजविण्यात आले होते. रंगीबेरंगी मंडपाच्या कमानी, राष्ट्रीय कला अकादमीतर्फे साकारलेल्या आकर्षक रांगोळी आणि ठिकठिकाणी ठेवण्यात आलेल्या वैविध्यपूर्ण उपक्रमांनी पुणेकरांचे लक्ष वेधून घेतले. बुधवारी सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत पुणेकरांनी लक्ष्मी रस्त्यावरील ‘वॉक वे’ला भेट दिली. एरवी वाहनांच्या गर्दीत असणारा लक्ष्मी रस्ता बुधवारी पुणेकरांच्या गर्दीने सुखावला. तुम्हाला शहरातील रस्ते कसे हवे आहेत? यासंबंधीची माहिती नागरीकांना देण्यात येत होत, त्यास नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

ठळक वैशिष्‍ट्ये
- राष्ट्रीय कला अकादमीच्या वतीने नगरकर तालीम चौकात आकर्षक रांगोळी
- लहान मुलांनी लक्ष्मी रस्त्यावर ठिकठिकाणी ठेवलेल्या सापशिडी खेळाचा आनंद घेतला
- नकाशांच्या माध्यमातून महाराष्ट्राची, देशातील विविध शहरांची माहिती करून घेतली
- वाहतूक पोलिसांनी मुलांना वाहतूक चिन्हांची ओळख सहजसोप्या भाषेत करून दिली
- नागरिकांनी इलेक्‍ट्रीक सायकलवर फेरी मारण्याचा आनंदही घेतला
- तरुणी, महिलांची पावले रस्त्याच्या मध्यभागी असलेली सौंदर्य प्रसाधने, कपडे खरेदी करण्याकडे वळली
- चटपटीत खाद्यपदार्थांच्या स्टॉलकडेही गर्दी

लक्ष्मी रस्त्यावरून वाहने चालविताना अवघड होते तिथे बुधवारी आम्ही मुलांसमवेत मनसोक्तपणे पायी फिरत होतो. मुलांनी रस्त्यावरील बहुतांश खेळांचा आनंद घेतला. एरवी तुळशीबागेत खरेदी करत होतो, यावेळी मात्र थेट लक्ष्मी रस्त्यावरच खरेदीचा आनंद लुटला.
- सविता भोसले, गृहिणी.
-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत मोठा अनर्थ टळला! मोटरमनच्या क्षणभराच्या चुकेने प्रवाशांचा थरकाप, भांडूप स्थानक आलं तरी लोकल थांबली नाही, काय घडलं?

Gudipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत सत्ता समीकरणात मोठी उलथापालथ, भाजप अध्यक्षपदाच्या दिशेने

पुण्याची बातच न्यारी! मृणाल ठाकूरने पुण्यात येताच केली 'ही' गोष्ट, खास मराठी पोस्ट करत म्हणाली... 'पुण्यात आलो आणि...'

Indore Fire Accident : इमारतीला भीषण आग, ७ जणांचा होरपळून मृत्यू; इलेक्ट्रिक कार चार्जिंग करताना शॉर्टसर्किटमुळे दुर्घटना

SCROLL FOR NEXT