पुणे

लाखो पुणेकरांनी लुटला वाचनाचा आनंद

CD

लोगो
पुणे पुस्तक महोत्सव : ‘शांतता...पुणेकर वाचत आहेत’
........

पुणे, ता. ११ : एरवी गजबजाट असलेला अप्पा बळवंत चौक, लक्ष्मी रस्ता यांसह विविध चौक, सार्वजनिक ग्रंथालये, सरकारी कार्यालये, शाळा-महाविद्यालये अशा विविध ठिकाणी बुधवारी भर दुपारी बाराच्या सुमारास जागोजागी पुणेकर हातात पुस्तक घेऊन वाचत असल्याचे अनोखे चित्र पाहायला मिळाले. पुणे पुस्तक महोत्सवाचे औचित्य साधून ‘शांतता...पुणेकर वाचत आहेत’ हा उपक्रम राबविण्यात आला. यास विद्यार्थी, सरकारी अधिकारी, राजकीय नेत्यांसह वाचनप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने येत्या शनिवारपासून (ता. १४) पुणे पुस्तक महोत्सव सुरू होत आहे. यानिमित्त वाचनसंस्कृती वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. मुख्य कार्यक्रम माजी शिक्षण मंत्री व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मुख्य उपस्थितीत अप्पा बळवंत चौकाजवळील ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरी मंदिरापाशी झाला. आमदार हेमंत रासने, महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपक्रमात सहभागी होत पुस्तकाचे वाचन केले. विविध राजकीय नेत्यांसह कार्यकर्ते, सांस्कृतिक-कला क्षेत्रातील मान्यवर, शासकीय अधिकारी, शिक्षक-प्राध्यापक यांनीही यात सहभाग नोंदविला. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी पुस्तक वाचतानाची छायाचित्रे सोशल मिडियावरही प्रसिद्ध केली.
शाळा-महाविद्यालयांसह विद्यापीठे, विविध सरकारी कार्यालये, सामाजिक संस्था, शिक्षण विभाग, गणेशोत्सव मंडळे येथील नागरिक, अधिकारी, कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने उपक्रमात सहभागी झाल्याचे दिसून आले. या अंतर्गत नागरिकांनी दुपारी बारा ते एक या एका तासात पुस्तक वाचण्याचा आनंद लुटला. फर्ग्युसन महाविद्यालयासह अन्य महाविद्यालयांच्या आवारातही विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. अप्पा बळवंत चौक आणि लक्ष्मी रस्ता येथील दुकानांमध्येही वाचनासाठी काही पुस्तके ठेवल्याने ग्राहकांनाही वाचनाचा मनमुराद आनंद घेता आला.
समता भूमी, महात्मा फुले मंडई, मेट्रो स्थानक, पुणे महापालिका यांसह अनेक ठिकाणी नागरिकांनी पुस्तक वाचन केले.
..........
शिक्षण अधिकारीही सहभागी
या उपक्रमाला उच्च शिक्षण संचालनालयानेही प्रतिसाद दिला. संचालनालयातील सुमारे शंभर वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आवडीच्या पुस्तकाचे वाचन करीत सहभाग नोंदविला. यात उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, सहसंचालक डॉ. प्रकाश बच्छाव यांचा समावेश होता.
-----
पोलिसांचाही प्रतिसाद
या उपक्रमांतर्गत राज्य राखीव पोलिस दल, गट क्रमांक दोन येथे एक तास पुस्तक वाचन झाले. परेड मैदानावरील कार्यक्रमात ८४ पोलिस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले. राज्य राखीव पोलिस दलाचे विशेष पोलिस महानिरीक्षक अशोक मोराळे यांनी उपक्रमाच्या ठिकाणी भेट देऊन कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित केले.
-----

ग्रंथालयाची स्थापना
वारजे येथील अतुलनगरमधील ओव्हल नेस्ट सोसायटीत या उपक्रमाचे औचित्य साधून ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली. तेथील रहिवाशांनी पुस्तकाचे वाचन केले.
..........
आयुष्यात वाचनाला फार महत्त्व आहे. वाचनामुळे आयुष्याला दिशा आणि दृष्टी मिळते. राजकारण्यांनीही मन मोठे करण्यासाठी वाचन करणे गरजेचे आहे. अनेक राजकारणी उत्तम वाचक, लेखक आहेत. वाचनासाठी एकाग्रता लागते. महाराष्ट्रात सुमारे ११ हजार सार्वजनिक वाचनालयांमुळे वाचनाची चांगली संस्कृती आहे. या ग्रंथालयांना राज्य सरकारकडून ४०० कोटी रुपयांचे अनुदान दिले जाते.
- चंद्रकांत पाटील, आमदार व माजी मंत्री
........
उपक्रमाची वैशिष्ट्ये
- तब्बल तीन लाख ५० हजारांपेक्षा अधिक नागरिकांचा सहभाग
- सुमारे ३० हजारांहून जास्त नागरिकांनी पुस्तक वाचतानाची छायाचित्रे पाठवली

- जागोजागी नागरिकांनी घेतला पुस्तक वाचनाचा आनंद
.........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT