पुणे

खुनासाठी भाडेकरूकडून पाच लाखांची सुपारी

CD

पुणे, ता. ११ : हॉटेल व्यावसायिक सतीश सादबा वाघ (वय ५५, रा. मांजरी बुद्रूक) यांचा खून करण्यासाठी भाडेकरूनेच पाच लाख रुपयांची सुपारी दिल्याची बाब तपासात समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, अन्य दोघांना ताब्यात घेतले आहे. आरोपींनी सतीश वाघ यांचे मोटारीतून अपहरण करून त्यांचा खून केला होता.

सतीश वाघ हे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा आहेत. या प्रकरणी मुलगा ओंकार वाघ यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवन श्यामकुमार शर्मा (वय ३०, रा. शांतिनगर, धुळे), नवनाथ अर्जुन गुरसाळे (वय ३२, रा. अनसूया पार्क, वाघोली, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अक्षय हरीश जवळकर आणि विकास शिंदे या दोघांना वाघोली परिसरातील आव्हाळवाडीतून ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अक्षय जवळकर हा पूर्वी सतीश वाघ यांच्याकडे खोलीत भाडेकरू म्हणून राहत होता. त्यांच्यात वाद झाल्यामुळे अक्षयने खोली सोडली होती. या कारणावरून अक्षयने चार-पाच महिन्यांपूर्वी आरोपी पवनला वाघ यांचा खून करण्यासाठी पाच लाखांची सुपारी दिली होती. पवनने त्याचे साथीदार नवनाथ गुरसाळे, विकास शिंदे यांनी संगनमताने खुनाचा कट रचला. आरोपींनी जवळकर याच्याकडून अॅडव्हान्स रक्कम घेतली.

सतीश वाघ ९ डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता ‘मॉर्निंग वॉक’ला गेले होते. त्यावेळी आरोपींनी वाघ यांचे मोटारीतून अपहरण केले. त्यानंतर चाकूने त्यांचा खून करून मृतदेह उरळी कांचन परिसरात शिंदवणे घाटामध्ये फेकून दिला होता. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविला आहे. पुढील तपास अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड करीत आहेत.
-------
आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या मोटारीचे सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे लोकेशन प्राप्त केले. पोलिसांनी अथक परिश्रम करून आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी भक्कम पुरावे एकत्रित करण्यात येत आहेत. खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या गुन्ह्यात आणखी काही आरोपींचा सहभाग आहे का?, याबाबत तपास करण्यात येत आहे.
- शैलेश बलकवडे, अतिरिक्त पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा
-------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India China Trade : सहा वर्षांपासून बंद कुलूप अखेर उघडणार! भारत-चीन संबंधांना नवं वळण, गलवाननंतर पहिली मोठी हालचाल!

हमजा नाहीतर DHURANDHAR 2 चा खरा किंग आहे 'हा' अभिनेता, त्याने दाऊदला सुद्धा सोडलं नाही, 45 वर्ष केलं पाकिस्तानात राज

Rare Wildlife Ratnagiri : निसर्गप्रेमींसाठी मोठी बातमी! सह्याद्रीच्या पायथ्याशी पहिल्यांदाच दिसला राज्यप्राणी 'शेकरू'; जोडीदाराचाही शोध सुरू

Sangamner Acid Attack: संशयित आरोपीचे रेखाचित्र जारी; संगमनेर अ‍ॅसिड हल्ला प्रकरण, तपासासाठी दहा पथके तैनात!

Hingoli News: अवेळी पावसाने गहू काढणीला तडाखा; हार्वेस्टर अभावाने शेतकरी चिंतेत

SCROLL FOR NEXT