पुणे, ता. ११ ः नाताळनिमित्ताने प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने पुणे ते करमाळी विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या रेल्वेच्या ६ फेऱ्या होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
पुणे-करमाळी साप्ताहिक विशेष रेल्वे (०१४०७) ही २५ डिसेंबर ते ८ जानेवारी दरम्यान धावणार आहे. ही दर बुधवारी पुण्याहून पहाटे ५ वाजून १० मिनिटांनी सुटेल आणि रात्री ८ वाजून २५ मिनिटांनी करमाळीला पोहोचेल.
करमाळी-पुणे साप्ताहिक विशेष रेल्वे (०१४०८) २५ डिसेंबर ते ८ जानेवारी दरम्यान दर बुधवारी करमाळी येथून रात्री १० वाजून २० मिनिटांनी सुटेल. दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजता पुण्याला पोहोचेल. चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रस्ता, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रस्ता आणि थिविम आदी स्थानकांवर या रेल्वेला थांबा देण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.