पुणे

बॅलेट पेपरवर निवडणुकांसाठी काँग्रेसचे स्वाक्षरी अभियान

CD

पुणे, ता. ११ : विधानसभा निवडणुकीचे निकाल महाविकास आघाडीसाठीच नाही, तर राज्यातील जनतेसाठी धक्कादायक आहेत. कोणतीही लाट नसताना पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतील निकालाच्या एकदम उलट निकाल कसा काय लागू शकतो? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे यापुढे निवडणुका या बॅलेट पेपर घ्याव्यात, या मागणीसाठी शहर काँग्रेसच्या वतीने बुधवारी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.

प्रदेश क्राँग्रेसच्या सूचनेवरून पक्षाच्या वतीने राज्यभरात सर्वत्र ‘निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्‍यात’ यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे. आज पुण्यात शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवी पेठेत स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.

शिंदे म्हणाले, ‘‘या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीतील तफावत चिंताजनक आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता ५८.२२ टक्के मतदान झाले, त्याच रात्री ११.३० वाजता ते ६५.०२ टक्के, तर दुसऱ्या दिवशी २१ नोव्‍हेंबर रोजी हेच मतदान ६६.०५ टक्के झाल्याचे सांगितले. यामध्ये एकूण ७.८ टक्के वाढ झाली आहे. म्हणजे ७६ लाख मतांची ही वाढ असून, मतदानाचा टक्का कसा वाढला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे ईव्‍हीएम संदर्भातही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.’’

यावेळी माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, दीप्ती चवधरी, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, सचिव रफिक शेख, अजित दरेकर, लता राजगुरू, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, हनुमंत पवार, सुनील शिंदे, राज अंबिके, सुनील घाडगे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते.
-----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Update: अजिंक्य रहाणेने सोडले KKR चे कर्णधारपद? व्हायरल पोस्टने उडवली खळबळ, त्यात लिहिलंय...

BAMU Recruitment: मराठवाडा विद्यापीठात ७८ पदांसाठी तब्बल ६,९१४ अर्ज; हार्डकॉपीसाठी १८ मार्चपर्यंत मुदत

Latest Marathi News Live Update : नवी मुंबईत घरगुती गॅस टंचाई

ISrael-Iran War : इराणचा तेल जहाजावर हल्ला, मुंबईच्या इंजिनिअरचा मृत्यू; समुद्रात उड्या मारल्याने २७ जण बचावले

Teacher Cyber Fraud Case : तुमच्या मोबाईलवरही असा व्हिडिओ कॉल येतोय? CBI अन् पोलिसांच्या नावाने निवृत्त शिक्षकाला घातला 59 लाखांचा गंडा, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT