पुणे, ता. १३ : कलासंचालनालय, मुंबईतर्फे आयोजित ६४ व्या कला प्रदर्शनात विद्यार्थी विभागात कलामंदिर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या चित्र व शिल्पांची निवड करण्यात आली आहे. त्यात फाउंडेशन विभागात गौरांग खडपकर, पेंटिंग विभाग राधिका कौलगे, शिल्प विभाग कुशाल सखाराम कुंभार, सार्थक पुरेकर, सुरज पुरेकर, यश कुंभार, विजय कुंभार, आर्यन शेळवाडे, गणेश कुंभार, अनिकेत कुंभार, शिवम यमगणीकर, शिवम देसाई, करण कुंभार, स्वप्नील कुंभार, दर्शन मेस्त्री, निखिल कुंभार, साहिल राजे, बिरदेव एडके, दीपक कुंभार, सिद्धेश मेस्त्री, प्रणीत कुंभार, राज कुंभार, सिद्धेश कुंभार यांच्या शिल्पांची निवड झाली आहे. हे प्रदर्शन नागपूर येथे होणार आहे. संस्थेचे अध्यक्ष मारुतराव कातवरे, उपाध्यक्ष संभाजीराव माजगांवकर व सर्व संचालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.