पुणे

नगर रस्ता परिसरात सर्वंकष स्वच्छता मोहीम

CD

पुणे, ता. १३ : महापालिकेने सुरू केलेल्या सर्वंकष स्वच्छता (डीप क्लिनिंग) मोहिमेअंतर्गत गुरुवारी (ता. १२) नगर रस्ता परिसरात स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत कचरा, राडारोडा उचलणे, खड्डे दुरुस्ती, चेंबरमधील गाळ काढणे यासह अतिक्रमण, अनधिकृत फ्लेक्‍स व फलकांवर कारवाई करण्यात आली.
महापालिकेच्या विविध विभागांना एकत्र आणून त्यांच्यामार्फत एका-एका क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत स्वच्छता मोहीम राबविण्याचा उपक्रम महापालिकेने सुरू केला आहे. पहिल्यांदा ढोले पाटील रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर गुरुवारी नगररस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ही मोहीम झाली.
नवीन खराडी शिवणे रस्ता, खराडी बाह्यवळणावरील मुंढवा ते तुलसी हॉटेल येथील १६ हजार ४०० मीटर इंटरनेट केबल विद्युत विभागाने काढून टाकल्या, तसेच ३२ ठिकाणांवरील पथदिव्यांवर असलेली प्लॅस्टिकची झाकणे बदलली. स्थापत्य विभागाने ७० चौरस मीटरच्या भिंती रंगविण्यासह खड्डे दुरुस्ती, पावसाळी चेंबर उचलणे, मैलापाणी वाहिन्यांची सफाई करण्याची कामे केली. घनकचरा विभागाने २२ टन राडारोडा, तीन-चार टन ओला कचरा, आठ टन सुका कचरा, अडीच टन पालापाचोळा उचलला. अतिक्रमण विभागानेही अतिक्रमण कारवाईचा बडगा उगारला, तर आकाशचिन्ह विभागाने अनधिकृत फ्लेक्‍स व फलकांवर कारवाई केली. वृक्ष विभागाने झाडांच्या धोकादायक फांद्या काढल्या, तर बांधकाम विभागाने कल्याणीनगर परिसर, खराडी बाह्यवळण ते मुंढवा रस्त्यावरील १७ हजार चौरस फुटांच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली, अशी माहिती घनकचरा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT