पुणे

अन्ननलिका जोडताच वाढली नवजात बाळाची आयुष्यरेषा

CD

पुणे, ता. १३ : ‘त्या’ निरागस बाळाला जन्मतःच अर्धीच अन्ननलिका होती. तोंडापासून सुरू झालेली अन्ननलिका मध्येच तुटली होती. अन्ननलिकेचे दुसरे टोक पोटापर्यंत पोहोचत श्‍वसनलिकेला जोडले गेले होतो. त्यामुळे इवल्याशा जिवावर जन्मल्यानंतर काही तासांमध्ये शस्त्रक्रिया करण्याशिवाय पर्यायच नव्हता. त्यामुळे पुण्यातील वैद्यकीय तज्ज्ञांनी तुटलेली अन्ननलिका जोडली आणि बाळाची आयुष्यरेषा वाढली.
याविषयी बोलताना बालरोगतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास तांबे म्हणाले, ‘‘गर्भावस्थेतील नियमित सोनोग्राफी करताना बाळाला अन्ननलिका पूर्ण नसल्याचे प्राथमिक निदान झाले होते. पण, ऑक्टोबर महिन्यात गर्भ पूर्ण विकसित होण्यापूर्वीच म्हणजे जेमतेम ३१वा आठवडा (सातवा महिना) सुरू असतानाच प्रसूती करावी लागली. त्यानंतर केलेल्या तपासणीत नवजात अर्भकाची अन्ननलिका पूर्ण नसल्याचे निदान झाले. तोंडापासून सुरू होणाऱ्या अन्ननलिकेचे दुसरे टोक पाटोपर्यंत पोहोचत नव्हते. ते श्‍वसनलिकेला जोडले गेले होते. त्यामुळे जन्मल्यानंतर बाळाला आईचे दूध देता येणेच शक्य नव्हते. अशा वेळी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.’’
डॉ. तांबे पुढे म्हणाले, ‘‘जन्मल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच्यावर अन्ननलिका जोडण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. मुदतपूर्व प्रसूती झालेले नवजात अर्भक आणि त्याचे वजन अवघे १.३ किलोग्रॅम ही त्यातील सर्वांत मोठी दोन आव्हाने होती. त्याशिवाय केसांइतक्या बारीक रक्तवाहिन्या, अविकसित फुफ्फुसे असे असंख्य अडथळे समोर होते. पण, या सर्वांवर मात करत अन्ननलिका जोडण्याची शस्त्रक्रिया यशस्वी केली. शस्त्रक्रिया केल्यानंतर ती व्यवस्थित जुळली जाण्याचे मोठे आव्हान होते. त्यासाठी बाळाला स्थिर ठेवण्याची आवश्यकता होती. अशावेळी बाळाला नियंत्रित औषधे देऊन ते हालचाल करणार नाही, याची प्रकर्षाने काळजी घेण्यात आली. त्यामुळे आठ दिवसांमध्ये ती अन्ननलिका व्यवस्थित जुळली. या सर्व शस्त्रक्रियेनंतर त्या नवजात अर्भकाने जगात आल्यापासून दहाव्या दिवशी आईच्या दुधाचा पहिला घोट घेतला.’’

या शस्त्रक्रियेसाठी कृत्रिम अन्ननलिका तयार केली नाही. अर्भकाच्या पोटातील अन्ननलिका श्‍वसननलिकेशी जोडलेली होती. ती तेथून व्यवस्थित वेगळी करणे आणि तिचे टोक तुटलेल्या अन्ननलिकेशी व्यवस्थित जोडणे हा या शस्त्रक्रियेचा मुख्य उद्देश होता.’’
- बालशल्यचिकित्सक डॉ. प्रणव जाधव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telegram: टेलिग्रामवर मोफत चित्रपट आणि वेब सिरीज पाहणाऱ्यांना धक्का! आता फुकट काही पाहता येणार नाही; केंद्र सरकारची मोठी कारवाई

IPL ची 'गुगली'! RCB चा पहिला सामना चिन्नास्वामीवर होईल, असे BCCI ने जाहीर केले खरे; पण, तिथे होईलच याची खात्री नाही

Tanaji Malusare : कोण आहेत नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज? आता कुठे असतात अन् कशी आहे परिस्थिती..पाहा शिवरायांच्या वीर मावळ्याची पिढी

IPL 2026 Schedule: मुंबई इ़ंडियन्ससाठी 'हे' वेळापत्रक लकी ठरणार! २०१९ नंतर जुळून आलाय योगायोग, सहावी ट्रॉफी आपलीच

Latest Marathi News Live Update : चंद्रपुरात बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT