पुणे

ऑस्ट्रेलियन महिला रुग्णाने व्यक्त केल्या भावना

CD

पुणे, ता. १२ : ‘‘एक-दोन नाही तर तब्बल १४ वर्षे भगंदरचा आजार होता. अमेरिकेत उपचार करताना शरीराच्या मागच्या भागात चार-चार छिद्र घेतले होते. तेथून वेगवेगळ्या रंगाचे द्रव सतत बाहेर पडत होते. अशा स्थितीत आयुष्य जगण्यापेक्षा न जगलेलेच बरे अशी मानसिक स्थिती होती. ही स्थिती बदलून आता आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते चांगल्या पद्धतीने जगले पाहिजे, ही सकारात्मक भावना निर्माण झाली आहे. त्याचे सर्व श्रेय पुण्यातील वैद्यकीय तज्ज्ञांना जाते. कारण, मी रोगमुक्त झाले त्यामुळे ‘टेक्सस टू पुणे’,’’ अशा मार्मिक शब्दांत मूळच्या ऑस्ट्रेलियातील क्याला फ्युले या महिला रुग्णाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पुण्यातील हिलिंग हँड्स क्लिनिकमधील वैद्यकीय उपचारानंतर त्या बोलत होत्या. बोलताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि भगंदरसारख्या भयंकर आजारातून आपण बरे झालो आहोत, त्याचे समाधान स्पष्ट दिसत होते. त्या पुढे म्हणाल्या, ‘‘ऑस्ट्रेलियात केलेल्या सिटी स्कॅनमधून भगंदर १५ सेंटीमीटर झाल्याचे समजले. यावेळी पूर्णतः हतबल झाले होते. अशा वेळी फेसबुकवरील फिस्तुला सपोर्ट ग्रुपवर पुण्यातील हिलिंग हँड्स क्लिनिकची माहिती मिळाली. त्यानंतर थेट पुण्यात आले. कोलोरेक्टल सर्जन डॉ. आश्‍विन पोरवाल यांनी माझी तपासणी केली. त्यांनी ‘डिस्टल लिगेशन प्रॉक्सिमल लेसर’ (डीएलपीएल) पद्धतीने शस्त्रक्रिया केली. पुढील काही दिवस फॉलोअप घेतला आणि या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर आता मी पूर्णतः रोगमुक्त झाले आहे. याचे सर्व श्रेय मी डॉ. पोरवाल व हिलिंग हँड्स क्लिनिकच्या टीमला देऊ इच्छिते.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : विदर्भात उष्णतेची लाट तर या भागांत अवकाळी पाऊस लावणार हजेरी, आज तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान ? जाणून घ्या

पाणी मागणाऱ्या ६० वर्षीय वृद्ध महिलेला ‘मुले चोरणारी’ समजून मारहाण, नागपूरमधील धक्कादायक प्रकार...

Pune Accident: नवले पूलनंतर पुन्हा भीषण अपघात! जांभूळवाडीत ट्रक धडकून चालकाचा मृत्यू

Latest Marathi Live Update: सप्तशृंगी देवी ट्रस्टच्या विश्वस्त नियुक्तीला उच्च न्यायालयाची स्थगिती

Iran US Israel War : ‘होर्मुज’ला उत्तर ‘खार्ग’ने? बेट छोटं पण इराणच्या तेलसाम्राज्याचं हृदय... आता जगाला फटका बसणार?

SCROLL FOR NEXT