पाईट, ता. १३ : राजगुरुनगर व पुणे येथील गिर्यारोहकांनी रायगड जिल्ह्यातील कोकणदिवा, मानगड आणि कुर्डूगड हे तीन दुर्ग २५ किलोमीटरची पदभ्रमंती करीत एका दिवसात सर केले. नाशिकच्या टीम पॉइंट ब्रेक ॲडव्हेंचर्सच्या मार्गदर्शनाखाली राजगुरुनगर व पुणे येथील गिर्यारोहकांनी मानगडाच्या महादरवाज्यातून महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महाराजा यशवंतराव होळकर यांना वंदन केले.
या मोहिमेची सुरुवात पहाटे पाच वाजता सांदोशी गाव, (ता. महाड, जि. रायगड) येथून झाली. सर्वात अगोदर सुमारे साडेतीन तासांची चाल असलेला कोकणदिवा सर करण्यात आला. गड उतार होऊन मशिदवाडी मानगड (ता. माणगाव, जि. रायगड) येथे जाऊन अवघ्या अर्ध्या तासाची चाल असणारा मानगड सर केला. तर सर्वात शेवटी उंब्रे गाव (ता. माणगाव, जि. रायगड) येथे जाऊन दोन तासांची चाल असलेला कुर्डुगड सर करण्यात आला. गड उतार होण्यास रात्रीचे आठ वाजले. अशा प्रकारे एका दिवसात बारा तासांची पायपीट करीत तीन गिरीदुर्गांना भेट देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.