पुणे, ता. १३ : पुढील वर्ष (२०२५) आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित झाले आहे. या धर्तीवर सहकारी गृहनिर्माण संस्थांशी संबंधित विविध योजना राबविल्या जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर ‘सकाळ माध्यम समूहा’ची कौशल्य प्रशिक्षण संस्था एसआयआयएलसी आणि महाराष्ट्र राज्य व पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंट्स महासंघ (मर्यादित) यांच्यात सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या बळकटीकरणाबाबत गुरुवारी सामंजस्य करार करण्यात आला.
राज्यभरातील गृहनिर्माण संस्थांना व्यवस्थापनात येणाऱ्या अडचणी, व्यवस्थापनात व्यवस्थापकाचे महत्त्व व भूमिका आणि त्यासंबंधित विविध कौशल्य प्रशिक्षणांचे आयोजन या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून केले जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था (मर्यादित) व पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंट्स महासंघाचे (मर्यादित) अध्यक्ष सुहास पटवर्धन आणि ‘एसआयआयएलसी’चे सहसरव्यवस्थापक अमोल बिरारी यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी कार्यकारी संचालक कर्नल प्रमोद दहितुले (सेवानिवृत्त), कोषाध्यक्ष चारुहास कुलकर्णी, ‘एसआयआयएलसी’चे वरिष्ठ व्यवस्थापक अमित मांजरे इ.उपस्थित होते.
महासंघ ही गृहनिर्माण संस्थांची सर्वोच्च संस्था असून राज्यातील सव्वालाख नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधित्व करते. याशिवाय महासंघाला आता राज्यातील दोन लाख अपार्टमेंट्स कंडोमिनियम यांची शिखर संस्था म्हणूनही ओळख मिळाली आहे. अनेक गृहनिर्माण संस्थांना त्यांचे कामकाज सुरळीतपणे चालविण्यात अडचणी येतात. अशा गृहनिर्माण सोसायट्यांना कुशल व्यवस्थापकांची (सोसायटी मॅनेजर) गरज भासते. शिवाय अनेक सहकारी सोसायट्यांना स्वयंपुनर्विकास करायचा असतो. अशावेळी आर्थिक कर्जपुरवठा होण्यात अडचण येते. या सगळ्या प्रश्नांवर उत्तम उपाय देणारी तसेच कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देणारी सशुल्क प्रशिक्षणे या माध्यमातून आयोजिली जाणार आहेत. या कामी ॲड. विश्वजीत शिंदे, सचिव मनिषा कोष्टी यांचे सहकार्य लाभले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.