पुणे, ता. १३ ः ‘‘लोकमान्य सोसायटीतर्फे चालवल्या जाणाऱ्या नव्या ग्रंथालयासाठी पुणेकरांनी पुस्तके दान करावीत आणि ग्रंथालय व वाचन चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी हातभार लावावा,’’ असे आवाहन लोकमान्य सोसायटीचे संस्थापक-अध्यक्ष किरण ठाकूर यांनी केले आहे.
कोथरूडमधील महामृत्युंजयेश्वर मंदिराच्या परिसरात तयार करण्यात येणारे नवे ग्रंथालय लोकमान्य सोसायटीतर्फे चालविण्यात येणार आहे. सर्वांना हे ग्रंथालय विनामूल्य उपलब्ध असणार आहे. या ग्रंथालयासाठी पुणेकरांनी आपली वाचून झालेली किंवा वैयक्तिक ग्रंथालयात असलेल्या अधिकच्या पुस्तकांचे दान करावे. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर होत असलेल्या पुणे पुस्तक महोत्सवातील लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या विशेष संकलन केंद्रात १४ ते २२ डिसेंबरपर्यंत सकाळी ११ ते ८ या वेळेत ही पुस्तके आणून द्यावीत, असे आवाहन लोकमान्य सोसायटीतर्फे करण्यात आले.
पुणेकर वाचक, रसिक अधिक सजग आहेत. वाचन चळवळीच्या या ज्ञानयज्ञात पुणेकरांनी आपली ज्ञानसमिधा अर्पण करत पुस्तकांचे दान देत, हा उपक्रम अधिक यशस्वी करावा, असे आवाहन मी करतो.
- किरण ठाकूर, संस्थापक-अध्यक्ष, लोकमान्य सोसायटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.