पुणे

विजयस्तंभ सोहळ्यासाठी यंत्रणांनी एकत्र काम करावे

CD

पुणे, ता. १३ : पेरणे फाटा येथे एक जानेवारीला आयोजित विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याकरीता येणाऱ्या अनुयायांना आवश्यक त्या सोयी - सुविधा पुरवण्यासाठी संबंधित विभागांनी नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केल्या.

विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी आढावा बैठक घेतली, त्यामध्ये या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी पोलिस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था तथा ‘बार्टी’चे महासंचालक सुनील वारे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

डॉ. दिवसे म्हणाले, ‘‘विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याकरीता ३१ डिसेंबर व १ जानेवारी या कालावधीत येणाऱ्या अनुयायांकरीता अधिक मेट्रो सेवा उपलब्ध करून देण्यात यावी. गतवर्षीपेक्षा या वर्षी बसेसची संख्या वाढविण्यात आली आहे. अनुयायांकरीता रस्त्यालगत विश्रांती कक्ष स्थापन करावे. कार्यक्रमाच्या दिवशी वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये, याकरिता नियोजन करावे. ठिकठिकाणी सुविधांबाबत माहिती फलक लावावे.’’

संपूर्ण परिसरात स्वच्छता ठेवण्याकरिता विशेष प्रयत्न करावे तसेच वीजपुरवठा अखंडितपणे सुरू ठेवण्यात यावा. परिसरात मदत केंद्र, नियंत्रण कक्षाची स्थापना करावी. कार्यक्रमाच्या ठिकाणी येणाऱ्या अनुयायांना आवश्यक त्या सर्व सोयी - सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात संबंधित विभागांनी समन्वय ठेवून कामे करावीत, अशा सूचना डॉ. दिवसे यांनी दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! आठवड्याच्या मध्यातच मुंबई लोकलवर पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे? वाचा...

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात आली महामंडळाची बस; गावकऱ्यांनी वाजत-गाजत केलं स्वागत...

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Aadul News : कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने संपविले जीवन; पैठण तालुक्यातील एकतुनी येथील घटना

नेटीझन्स भडकल्यावर नोराचं ते अश्लील गाण्याचं हिंदी व्हर्जन तात्काळ हटवलं पण इतर भाषांमध्ये जैसे थे !

SCROLL FOR NEXT