पुणे, ता. १३ ः आपले मत हरवले की चोरीला गेले? हे जाणून घेण्याचा हक्क मारकडवाडीतील मतदारांना नाकारणे याला संविधानिक अधिकार म्हणायचे का? महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर लोकांच्या मनात संभ्रम आणि शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पाच टक्के व्हीव्हीपॅट कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिटचे व्हेरिफिकेशन करा, अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज लोकसभेत केली. ‘जर कर नाही, तर डर कशाला?’ असे आव्हान त्यांनी दिले.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर मतदारांच्या मनात संभ्रम आणि शंका निर्माण झाली. सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी येथील नागरिकांना आपले मत कुठे हरवले की चोरीला गेले अशी शंका निर्माण झाली. या शंकेचे निरसन करण्यासाठी मारकडवाडी ग्रामपंचायतीने बॅलेट पेपरवर मतदान घेऊन सत्य पडताळून पाहण्याचा निर्णय घेतला. वास्तविक तिथला उमेदवार निवडून आला होता, तरीही लोकांच्या मनात संभ्रम, शंका निर्माण झाली होती. प्रशासनाने मतदान घेण्यास विरोध केला. याला संविधानिक अधिकार म्हणणार का? असा सवाल खासदार डॉ. कोल्हे यांनी लोकसभेतील चर्चेत भाग घेताना केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.