पुणे

‘हॅशटॅग तदेव लग्नम’ला आगळावेगळा मान

CD

पुणे, ता. २० ः शुभम फिल्म प्रॉडक्शन निर्मित ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून, या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. नाट्यगृहात प्रदर्शित होणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. नुकताच या चित्रपटाचा प्रीमिअर पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे नुकताच झाला. भव्य रांगोळी, ढोलपथक असा अस्सल मराठमोळा थाट यावेळी उपस्थितांना अनुभवायला मिळाला. या दिमाखदार सोहळ्याला कलाकारांसह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. नाट्यगृहात या खास शोला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
या नव्या उपक्रमाबद्दल अभिनेता सुबोध भावे म्हणाला, ‘‘मराठी चित्रपटांना महाराष्ट्रात थिएटर मिळत नाहीत. मग अशावेळी पर्याय काय? तर नाट्यगृहे. आता नाट्यगृहांचा जेव्हा वापर होत नाही, तेव्हा ती पडून असतात. त्यांची देखभाल नीट होत नाही. तेथे चित्रपट प्रदर्शित केले तर त्यानिमित्ताने त्यांचा वापर होईल, योग्य देखभाल होईल. लोकांना रोजगार मिळेल. अनेक गोष्टी यातून सुरू होतील. तसेच नाट्यगृहांमध्ये चित्रपटाचे तिकीट दरही कमी असतील. आता हा आम्ही पुण्यात प्रयोग केला आहे. इतर अनेक ठिकाणी आम्हाला असे करायचे आहे.’’
चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले म्हणाले, ‘‘आमचा हा पहिलाच प्रयोग होता आणि त्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. या निमित्ताने स्वस्त दरात प्रेक्षकांना एका चांगल्या कलाकृतीचा अनुभव घेता येईल.’’ निर्माते शेखर मते म्हणाले, ‘‘नाट्यगृहात चित्रपट प्रदर्शित करण्याचा हा प्रयोग अनेक मान्यवरांच्या प्रयत्नामुळे आणि प्रशासनाच्या सहकार्यामुळे यशस्वी झाला. प्रेक्षकांचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून खूप आनंद झाला.’’
‘हॅशटॅग तदेव लग्नम’ चित्रपटात प्रेक्षकांना आजच्या तरुणाईचे लग्नाबाबतचे विचार दाखवण्यात आले आहे. ज्यात धमाल, मजामस्ती आहेच, याव्यतिरिक्त यातील काही गोष्टी भावनिकरीत्या गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. या चित्रपटात सुबोध भावे, तेजश्री प्रधान, प्रदीप वेलणकर, मानसी मागीकर, संजय खापरे आणि शर्मिष्ठा राऊत यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Price Hike India : सामान्यांच्या खिशाला कात्री ! प्रिमियम पेट्रोल अन् डिझेलच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

IPL 2026: श्रेयस अय्यर सामन्यांना मुकणार? पंजाबच्या विजयानंतर स्वत:च दिली दुखापतीवर महत्त्वाची अपडेट

Latest Marathi News Live Update : अशोक खरात प्रकरण तापलं; जैन समाजाच्या फसवणुकीचा आरोप, कारवाईची मागणी

Pune Crime: चाकणला गॅस टँकरमधून बेकायदा गॅस भरणा; तिघांना पोलिसांनी केली अटक, ४९ लाखांचा मुद्देमाल जप्त!

लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा घेणार निरोप, मराठमोळ्या अभिनेत्रीचं होणार नुकसान, नक्की कारण काय?

SCROLL FOR NEXT