पुणे

खाण व क्रशर चालकांचा संप नऊ दिवसानंतर मागे

CD

पुणे, ता. १ : विविध मागण्यांसाठी पुणे जिल्हा खाण व क्रशर उद्योजक संघाने गेल्या नऊ दिवसांपासून पुकारलेला बेमुदत संप अखेर सोमवारी मागे घेण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील बांधकामे आणि विविध प्रकल्पांची कामे गतीने मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
गौणखनिज विभागाच्या भरारी पथकाकडून होणारा त्रास, परवाना नूतनीकरणास होणारा विलंब यासह विविध कारणांमुळे संघाच्या वतीने बेमुदत संप पुकारण्यात आला होता. गेल्या नऊ दिवसांपासून हा संप सुरू असल्यामुळे शहर व परिसरातील विकासकामांना त्याचा फटका बसण्यास सुरूवात झाली होती.
संघाने देखील या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवदेन दिले होते. दरम्यान महापालिका आणि पीएमआरडीएने देखील या संदर्भात जिल्हा प्रशासनाला पत्र देऊन या संपाबाबत तोडगा काढावा, अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांना केली होती. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची दखल घेत संघाच्या स्थानिक पातळीवरील अडचणी दूर करण्याबरोबरच भरारी पथक रद्द करण्याचा निर्णय घेतला. तर राज्य सरकारच्या पातळीवर प्रश्‍नासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांच्या उपस्थितीत संघाच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक झाली. त्यामध्येही शासनाने संघाच्या मागण्या तत्त्वत: मान्य केल्या.
संघाचे कार्याध्यक्ष प्रदीप कंद, रामभाऊ दाभाडे, रामदास काकडे, योगेश ससाणे यांच्या उपस्थितीत तीनशे पदाधिकाऱ्यांची बैठक रविवारी (ता. ३०) झाली. त्यामध्ये एकमताने बेमुदत संप मागे घेण्याचा निर्णय झाला असल्याचे ससाणे यांनी सकाळशी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gagangad Fort : स्वामी गगनगिरी महाराजांची तपोभूमी अन् शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला 'गगनगड' ठरला राज्य संरक्षित स्मारक; शासनाचा मोठा निर्णय

Khashaba Teaser: 'सैराट'नंतर पुन्हा इतिहास रचणार? नागराज मंजुळेंच्या 'खाशाबा'चा दमदार टीझर प्रदर्शित, मातीचा खेळ पहायला मिळणार

Latest Marathi News Live Update : उत्तराखंडमध्ये पावसाचा तडाखा; बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळून महाराष्ट्रातील भाविक अडकले

Share Market AI Rules: शेअर बाजारात AI च्या मदतीने ट्रेडिंग करताय? थांबा! गुंतवणुकीबाबत SEBIचा मोठा इशारा; जाणून घ्या नवे नियम

Koyna Dam Water level Update : महाबळेश्वर, नवजा अन् कोयनेत दमदार हजेरी; गेल्या 12 तासांत 'इतक्या' मिमी पावसाची नोंद, धरणाची स्थिती काय?

SCROLL FOR NEXT