पुणे

वारकऱ्यांची सेवा करणारे पंढरीचे ‘वारीवीर’

CD

पुणे, ता. १ : ‘‘ज्ञानोबा-तुकोबांची पालखी खांद्यावर घेऊन टाळ-मृदंगाच्या नादात, विठू नामाच्या गजरात पंढरीच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांची सेवा करण्याचे भाग्य आपल्याला मिळत आहे. पायी वारीत चालून थकलेल्या वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरविण्याचा हा उपक्रम स्तुत्य आहे. वारकऱ्यांची सेवा करणारे आपण सर्वजण पंढरीचे ‘वारीवीर’ आहात,’’ अशी भावना राज्याचे माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांनी व्यक्त केली.
सिंबायोसिस विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधन केंद्र, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आणि शीला राज साळवे मेमोरिअल ट्रस्ट यांच्यावतीने संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांसाठी फिरता दवाखाना उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
या उपक्रमांतर्गत यंदा दहा सुसज्ज रुग्णवाहिका, पाच दुचाकी रुग्णवाहिका आणि तीनशेहून अधिक डॉक्टर, परिचारिका आणि स्वयंसेवकांचा गट वारीत सेवा करत आहे. या उपक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी पुणे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, ‘सिंबायोसिस’चे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, विश्वस्त संजीवनी मुजुमदार, प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, अधिष्ठाता डॉ. राजीव येरवडेकर, ट्रस्टचे संस्थापक, माजी नगरसेवक ॲड. अविनाश साळवे, परिवहन अधिकारी अनिल वळीव, अँड. नीलेश निकम आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Yojana: खुशखबर! 'या' महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात येणार २००० रुपये; किसान योजनेबाबत मोठी अपडेट समोर

Nitesh Rane, Disha Salian case : आदित्य ठाकरे दिशा सालियान प्रकरणावर नितेश राणे तोंड सांभाळणार, थेट सांगून टाकलं 'धन्यवाद'...

Pathardi Bribery Case : पाथर्डीत अडीच लाखांची लाच घेताना पोलिस अटकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Kolhapur Rain Alert : घाट माथ्यासह कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचं कमबॅक! पुढील चार दिवस 'या' मुदतीत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज, 'यलो अलर्ट' जारी

Marathi News Live Updates : तामिळनाडूतील तंजावर येथे २३ रोजी होणार दक्षिण भारतातील पहिलेच मराठी साहित्य संमेलन

SCROLL FOR NEXT