पुणे, ता. २ ः शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे प्रकार वाढले असून पोलिस देखील त्यात फसत आहेत. सायबर चोरट्यांनी पुणे शहर पोलिस दलातील एका पोलिस शिपायाची सात लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत एका पोलिस शिपायाने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार पोलिस शिवाजीनगर पोलिस वसाहतीत राहायला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात पोलिस शिपायाने सोशल मीडियावर एक जाहिरात पाहिली होती. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास तिप्पट परतावा देण्याचे आमिष जाहिरातीत दाखविण्यात आले होते. जाहिरातीतील मोबाईल क्रमांकावर पोलिस शिपायाने संपर्क साधला. तेव्हा सायबर चोरट्यांनी शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष त्यांना दाखविण्यात आले.
चोरट्यांनी त्यांना एक ॲप्लिकेशनची माहिती दिली. त्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून चोरट्यांनी त्यांना गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानंतर गेल्या आठ महिन्यांत त्यांनी चोरट्यांनी सांगितलेल्या बँक खात्यात वेळोवेळी सात लाख ४५ हजार रुपये जमा केले. चोरट्यांनी ॲपच्या माध्यमातून त्यांना चांगला परतावा मिळाल्याचे भासविले. ॲपद्वारे परताव्यापोटी जमा झालेली रक्कम त्यांनी काढून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रक्कम मिळाली नाही. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत या गुन्ह्याचा तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.