पुणे

अग्रवाल पिता-पुत्राला जामीन

CD

पुणे, ता. २ ः कल्याणीनगर अपघात प्रकरणात कारचालक अल्पवयीन मुलाचा गुन्हा स्वतःच्या अंगावर घेण्यासाठी दबाव आणत चालकाच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याप्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना न्यायालयाने प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. एस. बारी यांनी हा आदेश दिला.
चालक गंगाधर शिवराज हेरीक्रुब (वय ४२) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. अल्पवयीन मुलाचा गुन्हा स्वतःच्या अंगावर घेण्यासाठी चालकाच्या अपहरणाचा प्रयत्न करून त्याचा मोबाईल फोन काढून धमकावल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सुरेंद्रकुमार ब्रह्मदत्ता अग्रवाल (वय ७७) आणि विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल (वय ५०, दोघे रा. बंगला क्रमांक एक, ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी) यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. जामीन मिळाल्यामुळे सुरेंद्रकुमार अगरवाल कारागृहाबाहेर येण्याची शक्यता आहे. तर रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असल्याने शिवानी विशाल अग्रवाल यांचा मुक्काम येरवडा कारागृहातच असणार आहे. जामीन अर्जावर सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील योगेश कदम आणि बचाव पक्षातर्फे ॲड. प्रशांत पाटील यांनी बाजू मांडली.

या अटींवर जामीन
- आठवड्यातून दोन वेळा पोलिस ठाण्यात हजेरी लावावी
- जिल्ह्याची हद्द सोडून बाहेर जायचे नाही
- पासपोर्ट पोलिसांकडे जमा करायचा
- साक्षीदारांवर दबाव आणायचा नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adinath Maharaj: आदिनाथ महाराज नेमके कसे जखमी झाले? प्रत्यक्षदर्शी काय सांगतात? ९ वर्षांपूर्वी महाराज झाले होते बेपत्ता

हेल्मेट नसताना दुचाकी भरधाव वेगात पळवली; वाटेतच डंपरची धडक बसली अन्... तरुणाच्या डोक्याची झालेली दशा पाहून नागरिकांचं काळीज चिरलं

Trending News : रात्रभर बाईक चालू ठेवली; घरात विषारी धूर..एकाच कुटुंबात ४ व्यक्तींचा गुदमरून मृत्यू, राज्यभर खळबळ, वाचा संपूर्ण प्रकरण

Phaltan Politics: फलटणमध्ये सेटलमेंटचं राजकारण? भाजपच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचा सभापती; रामराजेंचा गटही धक्कादायकरित्या सत्तेत..

महागडे LPG विसरा! भारताने शोधला नवा स्वयंपाकाचा गॅस; ऊर्जा क्षेत्रात महत्त्वाचा प्रयोग, जाणून घ्या मोठी योजना...

SCROLL FOR NEXT