पुणे

पुण्यात झिकाचा सातवा रुग्ण

CD

पुणे, ता. २ ः शहरात झिका विषाणूंचा संसर्ग झालेला सातवा रुग्ण मंगळवारी डहाणूकर कॉलमीमध्ये आढळला. आतापर्यंत आढळलेल्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यापैकी कोणालाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही.
डहाणूकर कॉलनी येथील ४५ वर्षीय महिलेला झिका विषाणूचा संसर्ग झाल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला. या रुग्णाला झिकाची सौम्य लक्षणे आहेत. यापूर्वी एरंडवणे भागातील चार आणि मुंढवा परिसरातील दोन रुग्णांना झिकाचे निदान झाले आहेत. त्यानंतर आता शहराच्या डहाणूकर कॉलनीमध्ये सातवा रुग्ण आढळला. यात सात रुग्णांमध्ये पाच महिला असून दोन पुरुष आहेत. पाच महिलांमध्ये दोन गर्भवती असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. या सर्व रुग्णांवर घरीच उपचार करण्यात आले. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
एडिस इजिप्ती या डासाच्या मादीपासून झिकाचे संसर्ग होतो. हा डास चावल्यानंतर झिकाचा विषाणू शरीरात प्रवेश करतो. त्या पार्श्वभूमिवर महापालिकेकडून रुग्ण आढळलेल्या घरांमध्ये आणि त्याच्या भोवतालच्या एक किलोमीटर भागात फवारणी करण्यात येत असल्याची विभागातर्फे सांगण्यात आले.

डासांच्या पैदाशीमुळे झिकाचा संसर्ग होतो. त्यामुळे शहरातील डासोत्पत्तीची स्थाने नष्ट करण्यावर भर दिला आहे. तसेच, डास चावणार नाही, तशा प्रकारे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. झिकाचे रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याला प्राधान्य दिले आहे. झिकाची लक्षणे दिसल्यास महापालिकेच्या दवाखान्यात किंवा खासगी दवाखान्यातून उपचार घ्यावे. विशेषतः रुग्ण आढळलेल्या भागातील गर्भवतींनी विशेष काळजी घ्यावी. त्यांनी त्यांच्या सोनोग्राफी नियमित कराव्या.
- डॉ. कल्पना बळीवंत, प्रमुख, आरोग्य विभाग, पुणे महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Record : ख्रिस गेलचा १७५ धावांचा विक्रम उद्ध्वस्त, Lhuan-Dre Pretorius ने रचला इतिहास; २८चेंडूंत १३८ धावा

बालीत सुट्टी एन्जॉय करणं पडलं महागात! नुसरत भरुचा हिचा भीषण अपघात, ऑक्सिजन सपोर्टवर मुंबईत आणलं, Video

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला CJPचे आंदोलन

Ratnagiri News : देवरूखच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटीस मोबाईल मेडिकल युनिट बंद; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Weather: ऑक्टोबर हीट'चा मुंबईला चटका, तापमानाचा पारा चाळिशीजवळ; पाहा IMDचा अंदाज

SCROLL FOR NEXT