पुणे

नोकरीच्या आमिषाने २९ लाखांची फसवणूक

CD

पुणे, ता. ३ : खडकीतील लष्करी रुग्णालयात नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने तिघांची २९ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लष्कराची गुप्तचर यंत्रणा आणि पोलिसांनी तपास करून कोल्हापूरमधील एकास अटक केली. संदीप बळवंत गुरव (वय ३९, रा. आपटेनगर, कोल्हापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत सातप्पा रामचंद्र वागरे (वय ४६, रा. कोल्हापूर) यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वागरे कोल्हापूर एसटी आगारात वाहक आहेत. २०२० मध्ये वागरे यांची एका मित्रामार्फत आरोपी गुरव याच्याशी ओळख झाली होती. गुरव याने लष्करातून निवृत्त झालो असून, लष्करातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी ओळख असल्याची बतावणी वागरे यांच्याकडे केली होती. वागरे यांचा भाचा अजिंक्य रेडेकर याला त्याने खडकीतील लष्करी रुग्णालयात नोकरी लावण्याचे आमिष दाखविले होते. वागरे यांची पत्नी माधुरी आणि मेहुणा विश्वास चौगुले यांनाही नोकरी लावण्याचे आमिष आरोपीने दाखविले होते. त्यानंतर गुरवने वागरे यांचा भाचा, पत्नी, मेहुण्याला कोल्हापुरातून खडकीत भेटण्यासाठी बोलाविले होते. केंद्र शासनाकडून खडकीतील रुग्णालयात जागा भरण्यात येणार आहे. तिघांना नोकरी लावण्यासाठी प्रत्येकी १२ लाख रुपये भरावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर गुरवने लष्करी रुग्णालयाच्या एका कक्षात नेले. त्यांना एका प्रश्नपत्रिका सोडविण्यास दिली. तिघांना कोल्हापूरला परत जाण्यास सांगितले. नोकरीबाबत विचारणा केल्यानंतर त्यांना पुन्हा पुण्यात बोलावून घेतले व बनावट नियुक्तिपत्र दिले. हे नियुक्तीपत्र घेऊन वागरे, रेडेकर, चौगुले खडकीतील लष्करी रुग्णालयात गेले. तेव्हा त्यांना नियुक्तीपत्र बनावट असल्याचे लक्षात आले. फसवणूक झाल्याचे समजताच वागरे यांनी तक्रार दिली आहे. लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेने तपास करून गुरवला ताब्यात घेतले. गुरवला अटक करण्यात आली असून, खडकी पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Dare Village : गावी आलो किंवा लंडनला गेलो तरी पोटदुखी, “ विरोधकांना कामातून उत्तर देईन”,एकनाथ शिंदेंनी दरेतून साधला निशाणा

रोहित शर्माचा Mumbai Indians मधील 'सहकारी' Ajit Agarkar ची जागा घेणार; आता हिटमॅन २०२७ चा वर्ल्ड कप खेळणारच...

सगळं सोडून द्यायचा विचार होता पण...; सुटकेनंतर संतोष पंडित काय म्हणाले? तुरुंगातल्या व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Panvel News: पनवेलमध्ये वाहतुकीत मोठे बदल! गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांसाठी प्रशासनाचे कडक पाऊल

SCROLL FOR NEXT