पुणे

आदिवासी साहित्याने आदिवासींच्या उन्नतीसाठी प्रयत्न करावेत : काकडे

CD

पुणे, ता. ३ : ‘‘आदिवासी समाजातील नागरिक मुख्य प्रवाहात येणे गरजेचे आहे. आदिवासी साहित्यानेही आदिवासींच्या उन्नतीसाठी, त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे,’’ असे मत इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आदिवासी विकास संस्था, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मराठी विभाग, इंद्रायणी महाविद्यालयाचा मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शतकातील आदिवासी साहित्य : स्वरूप आणि वाटचाल’ विषयावर एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या चर्चासत्राच्या उद्‌घाटनात अध्यक्ष म्हणून काकडे बोलत होते.
‘आदिवासी साहित्य’, ‘आदिवासी आणि इतर साहित्य’ या दोन साहित्य प्रवाहांचा अभ्यास होण्याची गरज असल्याचे डॉ. लोहोकरे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संदीप कांबळे, प्रा. सत्यजित खांडगे यांनी केले. यावेळी ज्येष्ठ कवी वाहरू सोनवणे, विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे, डॉ. संजय लोहोकरे, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रभाकर देसाई, मराठी विभागप्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्याला सलग चौथ्या दिवशी पावसानं झोडपलं, घरांमध्ये शिरलं पाणी; काही ठिकाणी गारपीट

Latest Marathi News Live Update : पुणे शहराला अवकाळी पावसाने झोडपले

Talwar Baba: भयंकर! तंत्र-मंत्र आणि भीतीचा खेळ... महाराष्ट्रातील ‘तलवार बाबा’चा काळा चेहरा उघड; 'असं' करायचा शोषण

He Kay Navin Review: 'हे काय नवीन' मध्ये खरंच काही नवीन आहे का? कशी आहे प्रिया उमेशची नवी वेब सीरिज?

Samruddhi Expressway Accidents : काय आहे 'हायवे हिप्नोसिस'? समृद्धीवर का होतायत अपघात? पूल ठरतात धोकादायक!

SCROLL FOR NEXT