पुणे

ढोले पाटील रस्ता भागात वाहतूक कोंडीचा त्रास

CD

पुणे, ता. ३ : मागील सहा महिन्यांपासून कोरेगाव पार्क, बंड गार्डन, ढोले पाटील रस्ता येथील रहिवासी वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झाले आहेत. त्यामुळे येत्या १० जुलैपर्यंत वाहतूक सुरळीत करावी, असा इशारा ‘वेक अप’ पुणे चळवळीचे संयोजक व माजी आमदार मोहन जोशी यांनी वाहतूक पोलिसांना दिला आहे.
वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टीने वाहतूक विभाग करत असलेले प्रयत्न आणि प्रयोग परिणामकारक ठरत नसल्यामुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत. या संदर्भात चर्चा करण्यासाठी पोलिस खात्याचे वाहतूक विभागाचे उपायुक्त रोहिदास पवार यांच्यासमवेत स्थानिक रहिवाशांची बैठक जोशी यांनी आयोजित केली होती. तसेच केळकर रस्ता आणि भिडे पुलादरम्यान होत असलेल्या वाहतूक कोंडीचीही चर्चा झाली. गर्दीच्या वेळी वाहतूक पोलिस नेमावा आणि बॅरिकेड्सची व्यवस्था करावी, अशी सूचना जोशी यांनी केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार शेरे यांनी तत्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले. बैठकीत धैर्यशील वंडेकर, समीर रूपानी व डॉ. विद्या दानवे, रोहन सुरवसे, सुरेश कांबळे सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं पुन्हा घसरलं! उच्चांकापासून तब्बल ₹31,000 नी स्वस्त; आज महिन्यातील सर्वात कमी दर, काय आहे भाव?

Gokul Dudh Sangh Crisis : 'गोकुळ'वर प्रशासक नियुक्तीच्या कारवाईने मुश्रीफांना मोठा धक्का; भाजप-महाडिक गटासोबतचा दुरावा नडला!

Angaraki Sankashti Chaturthi 2026: श्रीगणेशाच्या कृपेने पूर्ण होतील सर्व मनोकामना; फक्त ‘या’ सोप्या पद्धतीने भरा इच्छापूर्ती कलश

"विराट भाऊ, मला कॉल कर!" भर मैदानात स्टंप उडवल्यानंतर आयशोस्पीडचा राडा; व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल!

Latest Marathi News Live Update : फाशी नाही ठेचून मारा, नसरापूर प्रकरणातील आरोपीच्या पत्नीची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT