पुणे

विधानसभेच्या तोंडावर स्मारकांसाठी लगबग

CD

पुणे, ता. ४ : विधानसभा निवडणुका जवळ येत असताना राज्य सरकारने शहरातील विविध स्मारकांची काम लवकर सुरु होण्यासाठी लगबग सुरु केली आहे. भिडे वाड्याच्या स्मारकासाठी निविदा काढली असून, लवकरच भूमिपूजन होणार आहे. महात्मा फुले वाडा, सावित्रीबाई फुले स्मारकाचा कॉरिडॉर करण्यासाठी प्रशासनाने भूसंपादनासाठी चर्चा सुरु केली आहे. चांदणी चौकातील हिंदवी स्वराज्य निर्मिती शिल्पाची निविदा मान्य झाली आहे. तर संगमवाडी येथील लहुजी वस्ताद साळवे स्मारकाच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी त्रयस्थ संस्थेची नियुक्ती केली जाणार आहे, तसेच पूर्णाकृती पुतळा उभारणीसाठी शिल्पकाराची नियुक्ती केली जाणार आहे.

बुधवार पेठेतील भिडे वाड्यात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १८४८ मध्ये देशातील पहिली मुलींची शाळा सुरु केली होती. या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक उभे केले जावे अशी मागणी विविध संस्था, संघटनांची होती. त्यासाठी अनेकदा आंदोलनेही झाली. महापालिकेच्या मुख्यसभेत यासंदर्भात ठराव केला. पण जागा मालक व भाडेकरूंनी न्यायालयात याचिका दाखल केल्याने हे स्मारक होऊ शकले नव्हते. सुमारे १३ वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर भिडे वाड्याची जागा महापालिकेच्या ताब्यात मिळाली. या ठिकाणी तीन मजली स्मारक उभे राहणार असून, यामध्ये सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट, प्रशिक्षण वर्गासाठी खोल्या, ऑडिओ व्हिजवल शो आदीचा समावेश असणार आहे. या सात कोटी रुपयांच्या आराखड्यास अंतिम मान्यता मिळाली असून, महापालिकेने याची निविदा प्रक्रिया सुरु केली आहे.

महात्मा फुले स्मारक
महात्मा फुले पेठेतील फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचे एकत्रीकरण करण्याचा प्रस्ताव अनेक वर्षे रखडला होता. पण आता राज्य सरकारने यासाठी आरक्षणात आवश्‍यक ते बदल केला आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ यांनी नुकतीच बैठक घेऊन महापालिकेला स्मारकासाठी जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु करण्याची सूचना केली आहे. या कॉरिडॉरसाठी या परिसरातील १० हजार ९४२ चौरस फूट जागा भूसंपादीत केली जाणार आहे. यामध्ये ९२ मिळकती, ५०७ जागा मालक आणि २९९ भाडेकरूंचा समावेश आहे. महापालिका परिमंडळ उपायुक्तांनी रहिवाशांसोबत चर्चा करून भूसंपादनाची प्रक्रिया सुरु करण्यास सांगितले आहे, असे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.

साळवे स्मारकाच्या कामावर देखरेख
संगमवाडी येथील आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे लोकसभा निवडणुकीपूर्वी भूमिपूजन झाले. यासंदर्भात
महापालिकेत नुकतीच बैठक झाली. स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष अशोक लोखंडे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
या स्मारकाचे काम दर्जेदार व्हावे, यासाठी इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड (ईआयएल) या त्रयस्थ संस्थेची नियुक्ती केली जाणार आहे. त्यांच्याकडून कामाचे मूल्यमापन व लेखापरीक्षण केले जाईल, पुढील अडीच वर्षांत स्मारकाचे काम पूर्ण होईल. स्मारकाच्या आवारात लहूजी वस्ताद साळवे यांचा पुतळा साकारणार आहे. हा पुतळा कोणत्या शिल्पकाराकडून करून घ्यावा?, यासाठी महापालिकेला समितीच्या सदस्यांनी नावे द्यावेत, त्यानंतर निर्णय घेतला जाईल असे बैठकीत ठरले आहे. दरम्यान स्मारकासाठी ५०० पाईल्स (खड्डे) घेतले जाणार असून, त्यापैकी १५० पाईल्सचे काम पूर्ण झाले आहे, असे आयुक्त भोसले यांनी सांगितले.


चांदणी चौक स्मारक
चांदणी चौकात हिंदवी स्वराज्य निर्मिती शिल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी ६ कोटी ५६ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे. चांदणी चौकाकडून वारजेकडे जाणारा रस्ता आणि साताऱ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा रस्त्यामध्ये ५ हजार ५४२ चौरस मीटर मोकळ्या जागेत महापालिका
हे शिल्प साकारणार आहे. कमळाच्या पाकळ्यांच्या आकारातील कारंजे, १७ फूट उंचीच्या चौथरा, त्यावर २० फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्रॉंझचा पुतळा उभारला जाणार आहे. मुंबई, सातारा, कोथरूड या भागांतून येणाऱ्या नागरिकांना हा पुतळा दिसणार आहे.

तुमचे मत कळवा...
विधानसभा निवडणुका जवळ येत असताना अनेक वर्षांपासून रखडलेल्या शहरातील विविध स्मारकांची कामे सुरु करण्यासाठी प्रशासनाने लगबग सुरु केली आहे. याबाबत आपले मत कळवा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT