पुणे

महिलेशी असभ्य वर्तन; कंपनी मालकावर गुन्हा

CD

पुणे, ता. ४ ः महिला व्यवस्थापकाशी वारंवार जवळीक साधण्याचा प्रयत्न करून तिच्यासोबत असभ्य वर्तन करणाऱ्या कंपनी मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरेगाव पार्क परिसरात आणि कंपनीच्या बाहेर ५ मार्चपासून ३ जूनपर्यंत वेळोवेळी हा प्रकार घडला. याबाबत २६ वर्षीय तरुणीने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून मुकेश नयनमल कलानी (रा. शहनशाह सोसायटी, कोरेगाव पार्क) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुकेश कलानी याची कोरेगाव पार्क परिसरात रिटेल कंपनी आहे. फिर्यादी या कंपनीत वरिष्ठ कॉर्पोरेट व्यवस्थापक पदावर काम करतात. आरोपीने फिर्यादी यांना वारंवार संपर्क साधून त्यांच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादी राहत असलेल्या पत्त्यावर भेट वस्तू पाठवल्या. त्या जिममध्ये जात असताना व तिथून घरी परत जात असताना आरोपीने सतत पाठलाग केला. ऑफिसच्या कामानिमित्त केबिनमध्ये बोलावून अश्लील स्पर्श करून जवळीक साधून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. फिर्यादी यांना संपर्कात राहा व वेळोवेळी भेटत जा, नाहीतर माझ्याकडे असलेले पार्टीचे व तुझ्यासोबतचे फोटो व्हायरल करेन, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhagyashree Patwardhan : अभिनेत्री भाग्यश्रीने आरती केली, विजयसिंहराजेंचा लेकीसोबतचा वाद पुन्हा उफाळला; राजवाड्याच्या दरबार हॉलमध्ये काय घडलं?

Pune News: महसूल विभागात खळबळ! जमिनींवर परस्पर कुळ लावल्याच्या तक्रारी; राज्यभरातील मंजूर प्रकरणांची तपासणी, महसूलमंत्र्यांनी काय दिले आदेश?

Shirdi Temple: साई चरणी १९ लाखांची सोन्याची छत्री, १ कोटी २० लाखांचा चांदीचा नंदी; गणेश चतुर्थीच्या दिवशी भाविकांकडून अर्पण

Latest Marathi News Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गणपती आगमन सोहळा मिरवणुकीला गालबोट, दोघांचा अपघाती मृत्यू

Maharashtra Weather : राज्यात विजांसह पावसाची शक्यता; पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज

SCROLL FOR NEXT