पुणे

मुक्त विद्यालय मंडळात नावनोंदणीसाठी अंतिम मुदतवाढ

CD

पुणे, ता. ४ : महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी नव्याने प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन पद्धतीने नावनोंदणी प्रवेश अर्जासाठी ५ ते १५ जुलैपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. या कालावधीत विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.
मंडळाने ऑनलाइन नावनोंदणी प्रवेश अर्ज भरण्याचा आणि कागदपत्रे स्वीकारण्याबाबत तपशील जाहीर केला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांचे ऑनलाइन नावनोंदणी अर्ज १५ जुलैपर्यंत (रात्री ११.५९ वाजेपर्यंत) भरण्यात यावे, अशी सूचना राज्य मुक्त विद्यालय मंडळाचे प्रभारी सचिव शैलेंद्र पाटील यांनी दिली आहे. अर्ज भरण्यासाठीच्या सूचना मुक्त विद्यालय मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या सूचना वाचून अर्ज भरण्यास सुरुवात करावी, असेही मंडळातर्फे सांगण्यात आले आहे.

नावनोंदणी प्रक्रियेचा तपशील
५ ते १५ जुलै (रात्री ११.५९ वाजेपर्यंत)
विद्यार्थ्यांचे ऑनलाइन नावनोंदणी अर्ज भरणे

६ ते १९ जुलै
विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जावर नमुद केलेल्या संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करणे

२४ जुलै
संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, नमूद केलेले शुल्क, मुळ कागदपत्रे आणि यादी विभागीय मंडळात जमा करणे

http://msbos.mh-ssc.ac.in
ऑनलाइन नावनोंदणी अर्ज भरण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संकेतस्थळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT