पुणे

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

CD

पुणे, ता. ४ ः मेट्रोमोनियल संकेतस्थळावर झालेल्या ओळखीनंतर तरुणाने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. तिला भेटण्याच्या बहाण्याने तरुणीच्या घरी येऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. तरुणीने लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर लग्न करण्यास नकार दिला.
याबाबत २८ वर्षीय तरुणीने बुधवारी (ता. ३) सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यावरुन सुदर्शन संदीपान शिंगाटे (वय ३८ रा. चंद्रभागा अंगणं, आंबेगाव) याच्याविरुद्ध बलात्काराह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जानेवारी ते मे २०२४ या कालावधीत तरुणीच्या राहत्या घरी घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी आणि आरोपी यांची जानेवारी २०२४ मध्ये जीवनसाथी डॉटकॉम संकेतस्थळावर ओळख झाली होती. त्यानंतर आरोपीने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. त्याने वेळोवेळी मुलीच्या घरी येऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. मुलीने आरोपीकडे लग्नाबाबत विचारणा केली असता, त्याने लग्न करण्यास नकार दिला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मुलीने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
हडपसरमध्ये लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार
लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची आणखी एक घटना हडपसरमध्ये घडली. सोशल मीडियावर मैत्री झाल्यानंतर तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन लग्न करण्यास नकार दिला. हा प्रकार नोव्हेंबर २०२३ मध्ये हडपसर परिसरात घडला. याप्रकरणी ३० वर्षीय तरुणीने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अभिजित संभाजी हुलवान (रा. पंचवटीनगर, खानापूर, सांगली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी आणि फिर्यादी यांची सोशल मीडियावर ओळख झाली. आरोपीने सैन्यात कामाला असल्याचे सांगितले. तिला लग्नाचे आमिष दाखवून हडपसर परिसरात भेटण्यासाठी बोलावून घेतले. तिला एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने संबंध प्रस्थापित केले. त्यावेळी त्याने मोबाईलमध्ये तरुणीसोबत फोटो काढले. मुलीने लग्नाबाबत विचारणा केली असता, फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन लग्नास नकार दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut Allegation : आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळे एकनाथ शिंदे निवडणूक जिंकले, संजय राऊत यांचा गंभीर आरोप

Pune MLC Election 2026 : महाविकास आघाडीचे ठरले! पदवीधरची जागा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला, तर शिक्षक मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडेच..; कोणाला मिळणार संधी?

Hatkanangale Railway Accident : हेडफोन घालून मोबाईलवर बोलत निघालेल्या 17 वर्षीय युवतीचा रेल्वेखाली करुण अंत; डॉ. आंबेडकर वसतिगृहासमोरील रेल्वे रुळावर धक्कादायक घटना

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा

१ हजार ते ६,००० रुपयांत गरबा पार्टनर, व्हायरल पोस्टरनंतर भाजप आमदार आक्रमक; कठोर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT