पुणे

बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी अधिकाऱ्यासह पत्नीवर गुन्हा

CD

पुणे, ता. ४ ः बेहिशोबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी पुण्यातील तत्कालीन शिक्षण उपसंचालक आणि सध्या नंदूरबार येथे माध्यमिक शिक्षण अधिकारी म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यासह त्यांच्या पत्नीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे.
प्रवीण वसंत अहिरे (वय ४६), पत्नी स्मिता प्रवीण अहिरे (वय ४१, रा. आनंदनगर, पाथर्डी फाटा, नाशिक) अशी दोघांची नावे आहेत. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक रूपेश जाधव यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायदेशीर उत्पन्नापेक्षा स्वतःच्या व पत्नीच्या नावे ३१ लाख ७८ हजार २०० (ज्ञात उत्पन्नापेक्षा २५.२६ टक्के) किमतीची अपसंपदा भ्रष्ट मार्गाने जमविल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. ‘एसीबी’ने दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण अहिरे हे पुण्यात शिक्षण उपसंचालक म्हणून नोकरीस होते. सध्या ते नंदुरबार येथे माध्यमिक शिक्षण अधिकारी म्हणून कर्तव्यावर आहेत. त्यांनी संपादित केलेल्या मालमत्तेबाबत पुणे ‘एसीबी’ कार्यालयाकडून चौकशी करण्यात आली होती. अहिरे यांनी संपादित केलेल्या मालमत्ता कायदेशीर पद्धतीने संपादित केल्या आहेत की नाही? याबाबत त्यांना वेळोवेळी संधी देऊन माहिती घेण्यात आली. मार्च २००२ ते फेब्रुवारी २०२० दरम्यानच्या कार्यकाळातील परिक्षण करण्यात आले. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या या कार्यकाळात कायदेशीर उत्पन्नापेक्षा स्वतःच्या व पत्नीच्या नावे ३१ लाख ७८ हजार २०० (ज्ञात उत्पन्नापेक्षा २५.२६ टक्के) किमतीची अपसंपदा भ्रष्ट मार्गाने जमविल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.

पत्नीकडूनच प्रोत्साहन
बेहिशोबी मालमत्ता संपादित करण्यासाठी प्रवीण अहिरे यांना त्यांची पत्नी स्मिता यांनीच प्रोत्साहित केले. त्यामुळे दोघांवर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधिक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने दिला जीव

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

SCROLL FOR NEXT