पुणे

शिवाजीराजे सांस्कृतिक भवनाचे काम मार्गी

CD

पुणे, ता. ५ ः वडगाव बुद्रूक येथील सहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या श्री शिवाजीराजे सांस्कृतिक भवन व कलामंदिराचे काम मार्गी लागण्यास आता मदत होणार आहे. गुरुवारी (ता. ४) झालेल्या महापालिकेच्या इस्टिमेट कमिटीच्या बैठकीत सांस्कृतिक भवनाच्या कामासाठी साडेअकरा कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली.
नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता) परिसरात महापालिकेचे नाट्यगृह किंवा सांस्कृतिक भवन नव्हते. त्यामुळे या परिसरात सांस्कृतिक भवन करण्याची स्थानिक नागरिकांची मागणी होती. त्यानुसार, महापालिका प्रशासनाने वडगाव बुद्रूक येथील सर्वे क्रमांक-३५ ते ४० या जागेवर श्री शिवाजीराजे सांस्कृतिक भवन व कलामंदिर उभारण्याचे निश्‍चित केले होते. त्यास महापालिकेने मान्यता दिली होती. सांस्कृतिक भवनाच्या उभारणीसाठी ४५ कोटी रुपये खर्च येईल, असा अंदाज होता. या कामाच्या १ ते ४ टप्प्यामध्ये दुमजली तळघर पार्किंग स्लॅब, नाट्यगृहाच्या प्रेक्षक गॅलरीच्या बैठक व्यवस्थेचे बांधकाम, कलाकारांच्या ग्रीन रूम व अन्य हॉलचे बांधकाम झाले आहे. तसेच नाट्यगृहाच्या पत्र्याच्या छताचे काम देखील झाले आहे. मात्र, निधी कमतरतेमुळे २०१७ पासून सांस्कृतिक भवनाचे काम प्रलंबित होते. हे काम पूर्ण करण्याची मागणी स्थानिक राजकीय व्यक्ती, नागरिकांकडून केली जात होती. मात्र, महापालिका प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. गुरुवारी झालेल्या इस्टिमेट कमिटीच्या बैठकीत संबंधित सांस्कृतिक भवनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यामध्ये तेथील उर्वरित कामासाठी ११ कोटी ६० लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. या पैशांमधून अपूर्ण बांधकाम, सभागृहाच्या छताचे काम, आर्ट गॅलरी, संग्रहालय, पाइपलाइन, जनरेटर इमारत, काँक्रीटचे रस्ते, सीमाभिंत, प्रवेशद्वार कमान या स्वरूपाची कामे केली जाणार असल्याची माहिती भवन विभागाचे प्रमुख युवराज देशमुख यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेच दिलेला वर्चस्व गाजविण्याचा सल्ला, कुपर कोनोलीनं स्पष्टच केला खुलासा

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी राबवला अनोखा उपक्रम ! मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT