पुणे

पुणे लोहमार्ग पोलीस भरतीची रविवारी लेखी परिक्षा

CD

पुणे, ता. ५ : पुणे लोहमार्ग पोलिस विभागाने घेतलेल्या पोलिस भरती प्रक्रियेअंतर्गतची लेखी परीक्षा रविवारी (ता. ७) होणार आहे. या परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी दिलेल्या वेळेत परीक्षेसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन पुणे लोहमार्ग पोलिस विभागाचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी केले आहे.
पुणे लोहमार्ग पोलिस विभागाच्या पोलिस भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्याची माहिती पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुणे लोहमार्ग पोलिस विभागातर्फे पोलिस शिपाई पदावरील ५० जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली होती. त्यासाठी तीन हजारांहून अधिक अर्ज आले होते. त्यापैकी १६०० जण मैदानी चाचणीत पात्र ठरले होते. या उमेदवारांपैकी मैदानी चाचणी, गुणवत्ता यादी, जात प्रवर्गनिहाय व समांतर आरक्षणानुसार एकास दहा याप्रमाणे ३८३ जणांची लेखी परीक्षेसाठी निवड करण्यात आली आहे. संबंधित उमेदवारांच्या नावांची यादी punerailwaypolice.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवारांनी सकाळी 7 वाजता परीक्षेच्या ठिकाणी हजर राहायचे आहे. परीक्षेसाठी आवश्‍यक साहित्य लोहमार्ग पोलिसांकडून दिले जाणार आहे. त्यामुळे पेन, पेन्सिल व अन्य कोणतेही साहित्य उमेदवारांनी आणू नये, असे आवाहनही दोशी यांनी केले आहे.

लेखी परीक्षेची माहिती
कधी - रविवार, ७ जुलै २०२४
कुठे - ए के न्यू लॉ ॲकॅडमी अँड पीएचडी रिसर्च सेंटर, २३९०, के. बी. हिदायतुल्ला रोड, आझम कॅम्पस, पुणे - ४११००१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT