पुणे

सुविधा केंद्रासाठी महाविद्यालयांना नोंदणी करण्याचे आवाहन

CD

पुणे, ता. ५ : तंत्रशिक्षण विभागांतर्गत विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत सुविधा किंवा पडताळणी केंद्रासाठी इच्छुक असणाऱ्या महाविद्यालयांना नोंदणीसाठी महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) शनिवारपर्यंत (ता. ६) मुदत दिली आहे.
प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सामाईक प्रवेश परीक्षा आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येतात. त्याअनुषंगाने तंत्रशिक्षण विभागामार्फत विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी सुविधा/पडताळणी केंद्रे नेमण्यात येतात. प्रवेश प्रक्रियेदरम्यान काही सुविधा केंद्रांबाबत विद्यार्थी-पालक यांच्याकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील प्रवेश प्रक्रियेदरम्यान सुविधा केंद्रांच्या अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त होऊ नये, यासाठी प्रवेश परीक्षा कक्षामार्फत सुसज्ज सुविधा उपलब्ध असणारी केंद्रे निवडण्यात येणार आहेत. त्याकरिता इच्छुक महाविद्यालयांना सीईटी सेलने नोंदणीकरिता पोर्टल उपलब्ध करून दिले आहे. महाविद्यालयांनी दिलेल्या कालावधीत ‘https://fcreg2024.mahacet.org’ पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक असल्याचे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.

शासकीय विद्यापीठ संचलित महाविद्यालयांनी नोंदणी करणे अनिवार्य आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी निवडलेल्या सुविधा केंद्रांनी नियमानुसार प्रक्रियेचे काम योग्यरितीने पूर्ण करणे आवश्यक आहे.
दिलीप सरदेसाई, आयुक्त, प्रवेश परीक्षा कक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Cricket: भारताच्या सुवर्णपदकाच्या शर्यतीला होणार सुरुवात! 'या' संघाविरुद्ध क्वार्टर-फायनलचा सामना, पाहा Schedule

Leg Cramps: रात्री पायात तीव्र कळ; स्नायू आखडतात अन् झोप उडते! जाणून घ्या शरीरातील पाण्याची कमतरता की गंभीर आजार?

Indrayani Express: इंद्रायणी एक्सप्रेस बालकासाठी थांबली; वेळेवर उपचाराने जीव वाचला

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना तब्बल 18 लाख एरियर? काय आहे चर्चेतील गणित? जाणून घ्या संपूर्ण हिशोब

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात INDIA आघाडी एकवटणार? 'या' तारखेला दिल्लीत मोठी बैठक

SCROLL FOR NEXT