पुणे

विशाल अग्रवालला न्यायालयीन कोठडी

CD

पुणे, ता. ५ ः बावधन खुर्द परिसरातील नॅन्सी ब्रह्मा या सोसायटीचे बांधकाम करताना मंजूर नकाशा व त्यानंतरच्या नकाशात बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल याने परस्पर बदल केला. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांकडून अग्रवाल याच्या चार दिवसांची पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने अग्रवाल याला न्यायालयीन कोठडी सुनावली.
बावधन येथील नॅन्सी ब्रह्मा सोसायटीतील ७२ सदनिकाधारकांच्या फसवणूकप्रकरणी अग्रवाल व त्याच्या साथीदारांविरुद्ध हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, कल्याणीनगर अपघात प्रकरणात येरवडा कारागृहात असलेल्या अग्रवाल याला पोलिसांनी अटक केली असून, त्याची पोलिस कोठडीची मुदत संपली होती. या प्रकरणात सोसायटीचे बांधकाम करताना मंजूर नकाशा व वेळोवेळी बांधकाम नकाशात बदल केला होता, त्यासंबंधी तपास करायचा आहे, तसेच सदनिकाधारकांकडून घेतलेल्या पैशांचा वापर नेमका कोठे केला, याबाबत बॅंकेशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र बॅंकेकडून अद्याप उत्तर आलेले नाही. त्यामुळे अग्रवालला चार दिवसांची पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी सहाय्यक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. पी. खंदारे यांनी अग्रवालला न्यायालयीन कोठडी सुनावली.

त्या आरोपींच्या जामिनावर
१२ जुलैला सुनावणी
कल्याणीनगर अपघात प्रकरणात रक्त नमुने तपासणीसह विविध गुन्ह्यांतर्गत कारागृहात असलेल्या डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हळनोर, विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल तसेच अमर गायकवाड या पाच आरोपींनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. मात्र या प्रकरणाचे मुख्य तपास अधिकारी सुनील तांबे हे अधिवेशनासाठी गेल्याने पोलिसांकडून मुदतवाढ मागण्यात आली होती. त्यानुसार न्यायालयाने संबंधित आरोपींच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली असून, ही सुनावणी आता १२ जुलैला होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunlight at Night: आता रात्रीही मिळणार सूर्यप्रकाश! अमेरिकेची कंपनी भारताच्या मदतीने अंतराळात पाठवणार ‘स्पेस मिरर’... कसं करणार काम?

Navi Mumbai: १० टक्के पाणीकपात हटणार, नवी मुंबईत २४ तास पाणीपुरवठा मिळणार; गणेश नाईकांची मोठी घोषणा

Water Conservation: दुष्काळी धाराशिवला ‘एआय’चे वरदान! उसासाठी पाण्याचा भरमसाठ उपसा टळला; ७७० शेतकऱ्यांच्या प्रयोगाने बदलले चित्र

Marathi News Live Updates: दुष्काळाच्या झळांनी लोणी गावातील दुग्ध व्यवसाय संकटात, पाणी आणि चाऱ्याअभावी साडेचारशे म्हशींचा सांभाळ कठीण, पशुपालकांवर जनावरे विकण्याची वेळ

Southwest Monsoon Withdrawal : महाराष्ट्रासह देशातून नैऋत्य मॉन्सूनची माघार; आता ईशान्य मॉन्सून सक्रिय, 'या' भागात ढगफुटीसदृश पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा

SCROLL FOR NEXT