पुणे

धायरीत तरुणावर कोयत्याने वार

CD

पुणे, ता. ५ ः पूर्ववैमनस्यातून टोळक्‍याने तरुणाचा पाठलाग करून त्याच्यावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना धायरी परिसरात भागात घडली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदीप नरसिंग चव्हाण (वय २५, रा. राया रेसिडेन्सी, पोकळे वस्ती, धायरी) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्रशांत ऊर्फ सोन्या प्रकाश कोळी (वय १८, रा. वरदविनायक हाईट्‌स, धायरी) व गणेश चंदू जायगुडे (वय १८, रा. गणेश रेसिडेन्सी, पोकळे वस्ती, धायरी) यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चव्हाण आणि त्याचे मित्र बुधवारी रात्री धायरी परिसरात गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी आरोपी जायगुडे, कोळी आणि त्यांचे साथीदार तेथे आले. त्यांनी त्यांच्याकडे मन्या कुठे आहे? अशी विचारणा करत त्यांना धमकाविण्यास सुरवात केली. या प्रकारामुळे चव्हाण व त्याचे मित्र घाबरून तेथून पळाले. मात्र चव्हाण हा शिव विहार सोसायटीच्या आवारात पाय घसरून पडला. त्यावेळी आरोपींनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. या घटनेत चव्हाण हा गंभीर जखमी झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Maratha Reservation: मनोज जरांगेंचा मुंबईकडे प्रवास सुरू; दोन वाहने आणि दोन रुग्णवाहिका सोबत, पाटोद्यात पहिला मुक्काम

Suryakumar Yadav: B. Com च्या दिवसांत असा दिसायचा सूर्या! त्याच्याच कॉलेजने शेअर केले अनसीन Photo; एकदा पाहाच

बुलडोझर कारवाईत मर्यादा ओलांडली; हायकोर्टानं अधिकाऱ्यांना फटकारलं, इमारत पुन्हा बांधा आणि १० लाख देण्याचे आदेश

Latest Marathi News Update : धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

SCROLL FOR NEXT